संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“टौरस" सैनिक विश्रामगृहाचे उद्घाटन

Posted On: 26 AUG 2022 3:28PM by PIB Mumbai

  

1.वेस्टर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल, एनएव्ही (Nav)के खंडुरी, एएसव्हीएम (AVSM), व्हीएसएम (VSM), जीओसी- इन- सी (GOC-in-C), यांनी 25 ऑगस्ट 2022 रोजी दिल्ली छावणी येथे "टौरस" सैनिक आरामगृहाचे उद्घाटन केले. भारतीय लष्कराने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) च्या सहकार्याने ही इमारत बांधली असून  दोन्ही संस्थांनी या पायाभूत प्रकल्पासाठी समान वाटा उचलला आहे.  या कार्यक्रमाला डीएमआरसीचे अधिकारीही उपस्थित होते.

2. या 148 खोल्यांच्या अत्याधुनिक इमारतीत, अत्यंत कलात्मक पद्धतीने डिझाइन केलेले वेटिंग लाउंज, इन-हाउस डायनिंग, हरित क्षेत्र आणि पुरेशी पार्किंग व्यवस्था आहे. ही सुविधा प्रामुख्याने सेवा देणारे/निवृत्त संरक्षण कर्मचार्‍यांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आणि  वैद्यकीय उपचारांसाठी दिल्लीत येणार्‍या लष्करी जवानांच्या कुटुंबीयांना निवासाची आरामदायी  सुविधा मिळावी याकरिता बांधण्यात आली आहे. हे विश्रामगृह; शेअर आणि केअरच्या सेवा तत्त्वांनुसार भारतीय लष्कराच्या, सेवारत/निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठीची वचनबद्धता दर्शवणारे आहे. 

***

R.Aghor/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1854654) Visitor Counter : 200


Read this release in: English , Urdu , Hindi