पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद

इंडिया @100 साठी पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद स्पर्धात्मकता आराखडा प्रकाशित करणार

Posted On: 25 AUG 2022 5:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2022

 

इंडिया  @100 साठी पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद(ईएसी -पीएम ) 30 ऑगस्ट  2022 ला स्पर्धात्मकता आराखडा प्रकाशित करणार आहे. हा आराखडा ईएसी -पीएम, डॉ. अमित कपूर यांच्या नेतृत्वाखालील दी इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेस आणि हॉवर्ड बिझिनेस स्कूलमधील प्राध्यापक माइकल ई. पोर्टर आणि  डॉ. क्रिश्चियन केटेल्स यांनी संयुक्तरित्या तयार केला आहे.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ विवेक  देबरॉय, , जी -20 शेर्पा अमिताभ कांत, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे  सदस्य संजीव सन्याल, यांच्या उपस्थितीत या  दस्तऐवजाचे प्रकाशन होईल.

या प्रकाशन कार्यक्रमात उपक्रमाचा  एक भाग म्हणून स्थापन केलेल्या भागधारक गटाच्या सदस्यांची पॅनेल चर्चा देखील असेल.

इंडिया@100 साठी स्पर्धात्मकता आराखडा  प्रोफेसर मायकेल ई. पोर्टर यांनी विकसित केलेल्या चौकटीवर  आधारित आहे.  इंडिया @100  हा आपल्या देशाच्या शताब्दी वर्षाकडील वाटचालीचा एक पथदर्शी  आराखडा आहे.  यात  आपण आपल्या राष्ट्रासाठी रेखांकित केलेल्या अफाट क्षमता आणि मोठ्या महत्त्वाकांक्षा साकार करण्यासाठी आवश्यक असलेल्या पावले  निश्चित करण्यात आली  आहेत.  हा आराखडा, वर्ष 2047 पर्यंत भारताला उच्च उत्पन्नाचा देश होण्याचा मार्ग सांगणारा आणि त्यासाठी  मार्गदर्शन करणारा आहे.   धोरणात्मक उद्दिष्टे, तत्त्वे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला शाश्वतता  आणि लवचिकतेच्या दिशेने पुढे नेण्यासाठी, सामाजिक प्रगती आणि सामायिक समृद्धीमध्ये अंतर्भूत असलेले दृष्टिकोन, हा आराखडा प्रस्तावित करतो.  हा आराखडा  भारताची सध्याची आर्थिक स्थिती आणि स्पर्धात्मक लाभांच्या  सखोल विश्लेषणावर  आधारित प्राधान्याच्या उपक्रमांचा एकात्मिक कार्यक्रम सादर करणारा आहे. अलिकडच्या वर्षांत  सरकारने केलेल्या अनेक सुधारणा पुढे नेत , भारतासाठी तात्काळ प्राधान्याच्या कृती आणि या कृती प्रभावीपणे पार पडाव्यात याकरिता  संघटित करण्यासाठी आवश्यक उपाय यामध्ये आहेत.

स्पर्धात्मकता दृष्टिकोन भारताच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणाचा आधारस्तंभ म्हणून भारताच्या विकासाला चालना देणारा  आणि प्रदीर्घ काळासाठी संवर्धन करणारा असावा,असे या दस्तऐवजात सांगण्यात आले आहे.

या आराखड्याचे प्रकाशन  इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (IGNCA), जनपथ, नवी दिल्ली येथे सकाळी 11:00 वाजता होईल. हा कार्यक्रम वार्ताहरांसाठी खुला आहे आणि  www.YouTube.com/arthsastra. च्या माध्यमातून  युट्यूबवरून थेट प्रसारित केला जाईल. 

 

N.Chitale/S.Kulkarni/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1854437) Visitor Counter : 184