PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
24 AUG 2022 7:35PM by PIB Mumbai

- 210.58 cr Total Vaccine doses (94.05 cr Second Dose and 14.30 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 27,17,979 doses administered in last 24 hours
- India's Active caseload currently stands at 96,442
- Active cases stand at 0.22%
- Recovery Rate currently at 98.59%
- 10,677 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
- 4,37,44,301
- 10,649 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (2.62%)
- Weekly Positivity Rate (3.32%)
- 88.35 cr Total Tests conducted so far; 4,07,096 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona


नवी दिल्ली/मुंबई, 24 ऑगस्ट 2022
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 210 कोटी 58 लाखांचा (2,10,58,83,682) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,80,21,928 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरु झाली. आतापर्यंत 4 कोटींहून अधिक (4,00,65,627) किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022पासून सुरु करण्यात आले आहे.
भारतातील कोविड उपचाराधीन रुग्णसंख्या आता 96,442 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.22% आहे.
त्यामुळे, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.59% झाला आहे. गेल्या 24 तासांत 10,677 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,37,44,301 झाली आहे.
गेल्या 24 तासांत, देशात नव्या 10,649 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,07,096 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 88 कोटी 35 लाखांहून अधिक (88,35,23,886) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.32% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 2.62% इतका नोंदला गेला आहे.
इतर अपडेट्स :
महत्त्वाचे ट्विट्स
* * *
N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1854197)
अभ्यागत कक्ष : 170