संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या ताश्कंद भेटीदरम्यान उझबेकिस्तान, कझाकस्तान आणि बेलारुसच्या समपदस्थांसोबत द्विपक्षीय बैठका, तिन्ही देशांदरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या उपायांवर केली चर्चा

Posted On: 23 AUG 2022 9:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2022

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या औपचारिक दौऱ्यासाठी उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद येथे आज 23 ऑगस्ट 2022 रोजी दाखल झाले. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजनाथ सिंह यांनी त्यांचे उझबेकी समपदस्थ लेफ्टनंट जनरल बाखोदिर कुर्बानोव्ह, कझाकस्तानचे संरक्षणमंत्री कर्नल जनरल झाकसिलिकोव्ह रुसलान झाकसिलिकोव्ह आणि बेलारूसचे संरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल व्हिक्टर ख्रेनिन यांच्याशी द्विपक्षीय बैठकांमध्ये चर्चा केली.

या बैठकांदरम्यान तिन्ही देशांसोबत संरक्षण सहकार्याच्या समग्र स्थितीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये परस्परांना फायदेशीर असलेल्या सहकार्यामध्ये वाढ करण्याच्या क्षेत्रांना लक्षात घेण्यावर भर देण्यात आला. परस्पर हिताच्या मुद्यांवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली. 24 ऑगस्ट 2022 रोजी संरक्षणमंत्री शांघाय सहकार्य संघटनेच्या(SCO) सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांदरम्यान संरक्षणविषयक सहकार्याच्या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेनंतर एक संयुक्त निवेदन जारी करण्यात येईल.

ताश्कंदमधील वास्तव्यादरम्यान, राजनाथ सिंह माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला भेट देतील आणि उझबेकिस्तानमधील भारतीय समुदायाची भेट घेतील.

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 


(Release ID: 1853987) Visitor Counter : 147


Read this release in: English , Urdu , Hindi