आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी भारत स्वास्थ्य महोत्सवाला केले संबोधित
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील आरोग्य सेवा क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या सन्मानार्थ भारत स्वास्थ्य महोत्सव पद्म डॉक्टर परिषदेचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार पद्म पुरस्कार निवड प्रक्रियेत मोठा बदल घडून आला असून आता सर्वसामान्य व्यक्तीचा देखील या पुरस्काराने गौरव होऊ शकतो : डॉ भारती प्रवीण पवार
Posted On:
22 AUG 2022 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2022
“पुरस्कार विजेत्याला मिळतो, तर सन्मान देशासाठी जगणाऱ्याचा होतो”, असे उद्गार केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी ‘भारत स्वास्थ्य’ महोत्सवाला संबोधित करताना काढले, या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार उपस्थित होत्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान देऊन उल्लेखनीय कार्य केलेल्या पद्म पुरस्कार विजेत्या डॉक्टरांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आर एस शर्मा यांचीही उपस्थिती होती.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातील आरोग्य क्षेत्रात अद्वितीय योगदान देणाऱ्या पद्म पुरस्कार प्राप्त डॉक्टरांचा गौरव करण्याच्या उद्देशाने पद्म डॉक्टर्स परिषदेची रचना करण्यात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार पद्म पुरस्कार निवड प्रक्रियेत मोठा बदल घडून आला असून आता सर्वसामान्य व्यक्तीचा देखील या पुरस्काराने गौरव होऊ शकतो, कारण आता नामांकन मिळालेल्या व्यक्तीच्या नावाला नव्हे तर त्या व्यक्तीच्या कार्यावर भर दिला जातो असे डॉ भारती प्रवीण पवार यांनी सरकारच्या प्रयत्नांविषयी बोलताना सांगितले. प्रत्येकाने येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळत राहील असे कार्य करण्याचे आणि स्वतःची क्षमता आणि सामर्थ्य वाढवून आरोग्य क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करण्यासाठी सिद्ध होईल असे योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
S.Thakur/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1853827)
Visitor Counter : 160