अर्थ मंत्रालय

परदेशी गुंतवणुकीविषयीचे नियम अधिसूचित


व्यवसायपूरक वातावरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल

Posted On: 22 AUG 2022 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑगस्‍ट 2022

 

परदेशी  विनिमय  व्यवस्थापन कायदा-फेमा 2015, कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांच्या धर्तीवर, आता, केंद्र सरकारने भारतीय रिजर्व बँकेच्या सल्ल्याने, बाहेर म्हणजेच परदेशात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीबद्दल देखील नियम तयार केले आहेत. भारतात राहणाऱ्या व्यक्तीकडून  परदेशात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचे नियमन, परदेशी विनिमय व्यवस्थापन (हस्तांतरण किंवा काही परदेशी सिक्युरिटीज जारी करणे) नियामक अधिनियम, 2004 आणि परदेशी विनिमय व्यवस्थापन (स्थावर मालमत्तेचे भारताबाहेर हस्तांतरण आणि व्यवहार) नियामक अधिनियम 2015 या दोन कायद्यांद्वारे केले जाते. 

भारत सरकारने, रिझर्व बँकेशी सल्लामसलत करुन, हे नियम अधिक सुलभ करण्यासाठी, एक व्यापक अभियान हाती घेतले. त्यानुसार तयार झालेला, परदेशी विनिमय व्यवस्थापन(परदेशात गुंतवणूक) नियम आणि परदेशी विनिमय व्यवस्थापन(परदेशात गुंतवणूक) नियामक आराखडा, नागरिकांच्या तक्रारी आणि सूचनांसाठी सार्वजनिक देखील करण्यात आला होता. परदेशातील गुंतवणूक तसेच भारताबाहेर स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण आणि व्यवहार करण्यासंबंधी याच नियमांच्या  आधारावर विद्यमान नियम लागू करण्यात आले आहेत.

भारतातील व्यवसायांच्या वाढत्या/बदलत्या गरजा, तसेच, जागतिक बाजाराशी वाढता समन्वय लक्षात घेता भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांनी जागतिक मूल्यसाखळीचा भाग होणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार, सध्या असलेला आराखडा अधिक सुलभ करत, परदेशातील गुंतवणुकीसाठी, सुधारित नियामक आराखडा तयार करण्यात आला असून, सध्याच्या व्यावसायिक आणि आर्थिक स्थिती-गतीशी तो अनुकूल असेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

परदेशात थेट गुंतवणूक आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीतील भिन्नतेबाबत स्पष्टता आणण्यात आली आहे तसेच, व्यवहारांशी संबंधित विविध परदेशी गुंतवणूक करण्यासाठी आधी जी प्रत्येक वेळी मंजूरी लागत असे, ती आता ऑटोमॅटिक म्हणजे थेट करण्यात आली आहे, यामुळे, ‘व्यवसायपूरक वातावरण’ निर्मितीला मोठे बळ मिळाले आहे.

परदेशी गुंतवणूक नियम 2022 इथे बघता येतील :

https://egazette.nic.in/WriteReadData/2022/238239.pdf

https://egazette.nic.in/WriteReadData/2022/238242.pdf

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853710) Visitor Counter : 241


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi