उपराष्ट्रपती कार्यालय

बळकट, न्याय्य आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था ही लोकशाही मूल्यांच्या उत्कर्षाची सर्वात सुरक्षित हमी – उपराष्ट्रपती

Posted On: 22 AUG 2022 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑगस्‍ट 2022

 

बळकट, न्याय्य आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था ही लोकशाही मूल्यांच्या बहरण्याची आणि उत्कर्षाची सर्वात सुरक्षित हमी असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज अधोरेखित केले. 

   

सर्वोच्च न्यायालयाच्या बार संघटनेने आज नवी दिल्ली येथे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या सत्कार समारंभात उपस्थितांना संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी लोकप्रिय संस्कृत श्लोक 'धर्मो रक्षति रक्षित:' (आपण कायद्याचे पावित्र्य जपले तर तो आपले संरक्षण करतो) उद्धृत केला आणि त्याला लोकशाहीचे ‘अमृत’ आणि कायद्याचे राज्य असे संबोधित केले.

    

अधिकारप्राप्त आणि उच्च पदांवर असलेल्या लोकांना व्यापक सार्वजनिक हितासाठी कायद्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यास आणि लोकशाही प्रणाली पुढे नेण्यास आणि वाढवण्यास सांगितले. थॉमस फुलरचा उल्लेख करून ते म्हणाले, "तुम्ही कितीही मोठे असलात तरी, कायदा नेहमीच तुमच्या पेक्षा मोठा आहे."

   

न्यायाधिशांचा सन्मान आणि न्यायव्यवस्थेचा आदर हा अत्यावश्यक आहे, कारण ते कायद्याचे राज्य आणि घटनावादाचे मूलतत्त्व आहेत यावर धनखड यांनी यावेळी भर दिला. देशातील संवैधानिक संस्थांच्या कामात सुसंवाद आणि एकजुटीची भावना ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

   

   

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1853709) Visitor Counter : 190