गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भोपाळ येथे केंद्रीय क्षेत्रीय परिषदेची 23 वी बैठक संपन्न
Posted On:
22 AUG 2022 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2022
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज भोपाळ येथे केंद्रीय क्षेत्रीय परिषदेची 23 वी बैठक झाली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बैठकीला उपस्थित होते, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे आभासी माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.
अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच सहकारी सांघिकवाद भावना मजबूत करण्याचे काम केले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या 8 वर्षांत नरेंद्र मोदी यांनी ‘टीम इंडिया’ ही संकल्पना राष्ट्रासमोर ठेवली आणि ती साकार करून दाखवली.
प्रादेशिक परिषदेच्या बैठकांची भूमिका जरी सल्लागाराची असली, तरी परिषद आणि तिच्या स्थायी समितीच्या बैठकांना महत्त्व देऊन अनेक समस्यांचे निराकरण केल्याचे गृहमंत्री म्हणून आपल्या तीन वर्षांच्या अनुभवाच्या आधारे आपण सांगत असल्याचे ते म्हणाले.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1853706)
Visitor Counter : 241