नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हरित ऊर्जा प्रकल्पांना कर्जपुरवठा करण्याकरिता 'इरेडा' चा 'महाप्रीत'शी सामंजस्य करार

Posted On: 22 AUG 2022 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑगस्‍ट 2022

 

इरेडा अर्थात भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था मर्यादित (IREDA) या संस्थेने 'महाप्रीत' अर्थात महात्मा फुले पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्या. (MAHAPREIT) या संस्थेशी काल एक सामंजस्य करार केला. महाप्रीत ही एमपीबीसीडीसी  (49% मालकी भारत सरकारकडे, 51% मालकी महाराष्ट्र शासनाकडे) च्या संपूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी आहे. या  सामंजस्य करारानुसार- सरकारी सुविधांसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी, आणि अक्षय  ऊर्जा उद्यानांच्या पायाभूत सुविधांसाठी उभारल्या जाणाऱ्या अक्षय  ऊर्जा प्रकल्पांसाठी इरेडा महाप्रीतला पतसुविधा पुरवणार आहे.

A picture containing person, indoor, room, tableDescription automatically generated

इरेडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार दास आणि महाप्रीतचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाली यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या सहकार्य करारानुसार, महाप्रीतच्या पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा आणि ऊर्जेचे कार्यक्षम उपयोजन तसेच संवर्धन प्रकल्पांचे कामही इरेडा हाती घेणार आहे.

A picture containing personDescription automatically generated

यावेळी इरेडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, "महाराष्ट्राच्या संतुलित व शाश्वत विकासासाठी महाप्रीतबरोबर भागीदारी करून तांत्रिक-वित्तीय कौशल्य उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. या प्रकारच्या सहयोगामुळे, वर्ष 2030 पर्यंत बिगर-जीवाश्म इंधनांद्वारे 50% ऊर्जा मिळविण्याच्या भारत सरकारच्या उद्दिष्टाला आम्ही पाठिंबा देऊ शकू."  तसेच, "अशा उपक्रमांमुळे हरित गुंतवणुकीला चालना मिळून हजारोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती होईल", अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

पुनर्नवीकरणक्षम ऊर्जेच्या क्षेत्रातील सतत वाढती मागणी लक्षात घेत, दोन वर्षांपूर्वी इरेडाने एका खास व्यवसाय विकास आणि सल्लागार विभागाची स्थापना केली. देशाच्या शाश्वत विकासासाठी सल्लासुविधा पुरवण्यासाठी गेल्या दोन वर्षांत इरेडाने केलेला हा नववा सामंजस्य करार आहे.
 

* * *

N.Chitale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1853689) Visitor Counter : 196