विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते पुण्यात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) नवीन इमारत संकुलाचे उद्घाटन, स्टार्ट-अप्स कंपन्यांच्या संस्थापकांशी साधला संवाद


एनसीएल कॅम्पसमध्ये सीएसआयआर- युआरडीपीआयच्या या नवीन संस्थात्मक इमारतीचे एका मिनी प्रदर्शनाद्वारे उद्घाटन

आरोग्य, ऊर्जा, पर्यावरण, डिजिटलीकरण आणि स्वयंचलन या विषयांवर काम करणाऱ्या निवडक 30 स्टार्ट-अप कंपन्यांचे संस्थापक प्रदर्शनात सहभागी

Posted On: 20 AUG 2022 7:55PM by PIB Mumbai

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज पुणे इथे औद्योगिक संशोधन परिषदेच्या नव्या इमारत संकुलाचे उद्घाटन केले आणि स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.  औद्योगिक संशोधन परिषद- युनिट फॉर रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑफ इन्फरमेशन प्रॉडक्टस् (सीएसआयआर- युआरडीपीआय)ची ही नवी इमारत एनसीएल परिसरात आहे  या नवीन संस्थात्मक इमारतीचे एका मिनी प्रदर्शनाद्वारे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात आरोग्य, ऊर्जा, पर्यावरण, डिजिटलीकरण आणि स्वयंचलन या विषयांवर काम करणाऱ्या निवडक 30 स्टार्ट-अप  कंपन्यांचे संस्थापक सहभागी  झाले होते.

सॅनिटरी पॅडची धूरविरहीत विल्हेवाट लावणारी आणि पुनर्वापराची जगातील पहिली प्रणाली आणि जगातील पहिला ड्युअल पॉवर (ग्रिड + मेकॅनिकल) बाय-फॅसिक डिफिब्रिलेटर यासारख्या पहिल्या नव संकल्पनांसह काम करणाऱ्या भारतीय स्टार्टअप्समध्ये डॉ जितेंद्र सिंग यांनी खूप रस घेतला. अशा जागतिक नवकल्पना विकसित करण्यासाठी मुक्त हस्ते निधी मिळावा यासाठी स्टार्टअप कंपन्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाशी संपर्क साधावा, असे आश्वासक आवाहन मंत्र्यांनी संस्थापकांना केले. भारताची स्टार्टअप व्यवस्था अधिक गतिमान आणि परिणामाभिमुख बनवण्यासाठी उद्योगांनी अशा यशस्वी कंपन्यांशी भागीदारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून (CDSCO) मान्यताप्राप्त भारतातील पहिले  ट्यूमर सेल निदान उपचार, भारतातील पहिले आणि एकमेव बायो-ॲक्टिव्ह काच आधारित सिंथेटिक बोन-ग्राफ्ट पर्यायी दंत उत्पादने, नेक्स्ट जनरेशन बायोनिक आर्म्स, मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर दृष्टी सुधारण्यासाठी इंट्रा-ऑक्युलर लेन्स आणि नेक्स्ट जनरेशन सोडियम आयर्न बॅटरी तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल डॉ जितेंद्र सिंग यांनी या कंपन्यांचे कौतुक केले.

डॉ जितेंद्र सिंग यांनी कृषी स्टार्ट-अप्समध्ये विशेष रस घेतला. भारतातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाच्या मालकांशी डॉ जितेंद्र सिंग यांनी सविस्तर संवाद साधला. या कंपन्या सेंद्रीय अन्न कचऱ्याचे कॉम्प्रेस्ड बायो गॅसमध्ये रूपांतर करतात.

सिंचन व्यवस्थापन अधिक विश्वासार्ह, खात्रीलायक आणि कार्यक्षम बनवणाऱ्या सेन्सर तंत्रज्ञानाचा देशातच विकसित करणाऱ्या कंपन्यांशीही त्यांनी संवाद साधला. या तंत्रज्ञानामुळे "प्रत्येक शेतात अधिक उत्पन्न" आणि पुढील पिढीतील कृषी जैविक पिकांना अधिक हवामान अनुकूल तसेच कीटक आणि रोगांना प्रतिबंध करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. कृषी स्टार्टअपना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन जितेंद्र सिंग यांनी दिले.

हवेच्या शुद्धतेचया दर्जावर देखरेख ठेवणारे रिअल-टाइम इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)-आधारित उपकरण (एअर क्वालिटी मॉनिटरिंग डिव्हाइस) आणि युनिकॉर्न स्टेटसची एक कंपनी  या प्रदर्शनात सहभागी झाली होती. या कंपनीने विनापरवाना स्पेक्ट्रममध्ये फायबर-क्लास, नॉन-लाइन-ऑफ-साइट ब्रॉडबँड मोठ्या प्रमाणात वितरीत करणारे पुढच्या पिढीचे 5G वायरलेस तंत्रज्ञान विकसित केले आहे.

एका कंपनीने फर्स्ट-इन-क्लास, पूर्णपणे स्वायत्त हाऊस कीपिंग, मटेरियल हाताळणी आणि औद्योगिक तसेच व्यावसायिक वापरासाठी सेवा देणारे रोबोट्स या प्रदर्शनात आणले होते. त्याआधीसीएसआयआर- युआरडीपीआय हे पेटंट अॅनालिटिक्स आणि इन्फॉर्मेटिक्समधील एक सुप्रसिद्ध प्रमुख राष्ट्रीय केंद्र आहेअसे नवीन इमारत संकुलाचे उद्घाटन केल्यानंतर डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

सीएसआयआर चे एक विशेष सेवा युनिट म्हणून, विशिष्ट ज्ञान-आधारित सेवा क्षेत्रासाठी, सीएसआयआर- युआरडीपीआय 22 वर्ष कार्यरत आहे.  ही संस्था संशोधनपूर्व आणि विकासपूर्व टप्प्यांना पाठबळ देते तसेच सतत विश्लेषण आणि माहिती सेवा पुरविण्यासाठी  सीएसआयआर- युआरडीपीआय समर्पित आहे. स्टार्ट-अप, लघु ते मध्यम व्यवसाय, भारतीय कॉर्पोरेट्स आणि बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन्सना साहाय्य देणाऱ्या सेवांव्यतिरिक्त नियमित, मिशन-मोड आणि संकल्पना आधारित सीएसआयआरचे संशोधन आणि विकास प्रकल्प यासाठी ही संस्था सतत कार्यमग्न असते, अशी माहिती त्यांनी दिली.

***

R.Aghor/P.Jambhekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853348) Visitor Counter : 206