संरक्षण मंत्रालय

मणीपूर येथील भूस्खलनात शहीद झालेल्या सशस्त्र दलाच्या जवानांच्या ‘वीर नारींचा’ संरक्षण मंत्र्यांनी केला सत्कार

Posted On: 18 AUG 2022 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑगस्‍ट 2022

 

मणिपूरमध्ये तुपूल येथे जून महिन्यात झालेल्या भूस्खलनात शहीद झालेल्या सशस्त्र दलाच्या जवानांच्या ‘वीर नारी’ यांना  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सन्मानित केले. पश्चिम बंगालमधील दार्जीलिंग जिल्ह्यातल्या बेंगडुबी लष्करी तळावर त्रिशक्ती कॉर्प्स द्वारे हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. जून महिन्यात झालेल्या या दुर्घटनेत एकूण 61 जण मृत्युमुखी पडले होते. यामध्ये 107 इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सैन्य ) 11 गोरखा रायफल्सचा एक अधिकारी, तीन कनिष्ठ अधिकारी आणि इतर श्रेणीचे 26 अधिकारी अशा एकूण तीस जवानांचा समावेश होता. संरक्षण मंत्र्यांनी ‘वीर नारींना’ प्रत्येकी सात लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 13 जवानांचा देखील या समारंभात सत्कार करण्यात आला.   

   

वीर नारी आणि सैनिकांशी संवाद साधताना राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांच्या शौर्याचे आणि समर्पणाची प्रशंसा  करत त्यांना आदरांजली वाहिली. या जवानांनी केलेल्या बलीदानाबद्दल देश सदैव त्यांचा ऋणी राहील असे ते म्हणाले. शूर सैनिकांचे कुटुंबीय आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना सरकार आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करत असून त्यांना संरक्षण मंत्रालयाचे पूर्ण सहाय्य मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले.

   

वीर नारी आणि सैनिकांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि तरुणांना सशस्त्र दलात यायला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि भारतीय लष्कराने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.    

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853002) Visitor Counter : 101