कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळसा मंत्रालयाने कोळसा खाणींच्या यशस्वी बोलीदारांबरोबर 16 करारांवर केली स्वाक्षरी


4286.53 कोटी रुपयांचा महसूल आणि 31945 रोजगाराच्या संधींचा अंदाज

Posted On: 17 AUG 2022 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2022

 

आगामी काळात कोळसा मंत्रालयाकडून 107 पेक्षा जास्त कोळसा खाणी लिलावासाठी उपलब्ध  केल्या जातील असे केंद्रीय कोळसा, खनीकर्म आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना  होते, ज्यामध्ये कोळसा मंत्रालयाने 13 वा टप्पा, 14 वा टप्पा आणि 12 व्या टप्प्याच्या दुसर्‍या प्रयत्नात झालेल्या 16 कोळसा खाणींच्या लिलावात यशस्वी ठरलेल्या बोलीदारांबरोबर करार केले. गेल्या चार महिन्यांमध्ये कोल इंडिया लिमिटेडने जवळजवळ 207 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन करून एक नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात 900 दशलक्ष टन उत्पादनाचे कोळसा मंत्रालयाचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.

वार्षिक 23.77 दशलक्ष टन या सर्वोच्च दर क्षमतेच्या पातळीवरील उत्पादन लक्षात घेता, व्यावसायिक लिलावाच्या या तीन टप्प्यांतून एकूण रु. 4286.53 कोटी इतका वार्षिक महसूल जमा होण्याचा अंदाज आहे.  पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर या कोळसा खाणींच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 31,954 रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. या खाणी कार्यान्वित करण्यासाठी एकूण 3565.50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.

या कार्यक्रमाला कोळसा खनीकर्म आणि रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे उपस्थित होते.   

* * *

S.Kakade/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1852695) Visitor Counter : 173


Read this release in: English , Urdu , Hindi