कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

अधिक चांगले परिणाम मिळविण्यासाठी सरकारकडून संस्थात्मक क्षमताबांधणी : केंद्रीय मंत्री डॉ. जीतेद्र सिंह


नवी दिल्लीच्या ‘आयएसटीएम’ मध्ये 2019 च्या सहाय्यक अधिका-यांच्या तुकडीला डॉ. जीतेंद्र सिंह यांनी केले मार्गदर्शन

नागरी सेवकांनी परिश्रमपूर्वक आणि परिणाम केंद्रीत पद्धतीने काम करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मंत्र्यांचे आवाहन

Posted On: 17 AUG 2022 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2022

 

पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जीतेंद्र सिंह  म्हणाले की, अधिकाधिक चांगले परिणाम मिळविण्यासाठी सरकारकडून संस्थात्मक क्षमताबांधणी केली जाते.  

नवी दिल्लीच्या ‘आयएसटीएम’(इन्स्टिट्यूट ऑफ सेक्रेटरिएट ट्रेनिंग अँड मॅनेजमेंट) मध्ये  2019 च्या सहाय्यक उपविभाग अधिका-यांच्या तुकडीला डॉ. जीतेंद्र सिंह यांनी आज  मार्गदर्शन केले.  यावेळी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातून नव्या भारताची निर्मिती  करताना प्रत्येक नागरिकाचे कल्याण करणे हा मुद्दा राष्ट्रीय   नियोजनाच्या आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहे.  जनतेचे कल्याण हा केवळ सरकारचा प्रमुख घटनात्मक कार्यक्रम आहे असे नाही, तर सरकारचे सहभागात्मक स्वरूपही सुनिश्चित करण्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे,असे त्यांनी सांगितले. 

एक अवघड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण सर्वजण आता सरकारी यंत्रणेचा एक हिस्सा बनले आहात, आपण सर्वजण कार्यक्षमतेने, हुशारीने आणि प्रभावीपणे आपली भूमिका कशी पार पाडणार याकडे संपूर्ण देश तुमच्याकडे पाहत आहे.

याप्रसंगी डॉ.जीतेंद्र सिंह यांनी केंद्रीय सचिवालय सेवेत रूजू झालेलया अधिका-यांचे अभिनंदन केले. या सचिवालयाच्यामार्फत प्रशासनात सातत्य प्रदान केले जाते, असे सांगून डॉ. सिंह यांनी डीओपीटी आणि आयएसटीएमच्या प्रशिक्षण विभागाला सर्व श्रेणीतल्या नागरी सेवेतल्या अधिका-यांची क्षमताबांधणीच्या  प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.  

 

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852687) Visitor Counter : 149


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi