प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार

भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाकडून ‘मंथन’ व्यासपीठाचा शुभारंभ


भारताच्या वैज्ञानिक मोहिमा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठण्यात, संशोधन आणि विकास सहयोग व्यापक प्रमाणावर पुढे नेण्याचे ‘मंथन’ हे प्रभावी व्यासपीठ

Posted On: 16 AUG 2022 4:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2022

 

देशांतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्राचं सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने स्थापन केलेल्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयान मंथन व्यासपीठाचा शुभारंभ केला आहे. या  कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग जगत आणि वैज्ञानिक, संशोधन आणि पर्यावरण विकास सहयोगाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहित करून भारताचा शाश्वत विकासाचे उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी एकरूप करण्याच्या उद्देशाने ‘मंथन’ ची स्थापना केली जात आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्याच्या स्मरणार्थ तसंच ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ अंतर्गत भारताच्या तंत्रज्ञानविषयक उत्क्रांतीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जगताला जवळ आणणे हा मंथनच्या आयोजनाचा उद्देश आहे. पीएसए अर्थात प्रधान वैज्ञानिक सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘मंथन’ हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवनिर्मित सामाजिक परिणाम आणि त्यावर योजलेल्या उपायांच्या संरचनेत संभाव्य बदल घडवून आणू शकेल.

माहितीच्या आदान प्रदानाची संत्रे, प्रदर्शन आणि भविष्यातील विज्ञान, नवनिर्मिती आणि तंत्रज्ञानाधारित वृद्धीत रचनात्मक विकास घडवण्यासाठी या मंचाअंतर्गत उपक्रम राबविण्यात येणार आहेत. NSEIT म्हणजेच भारतीय राष्ट्रीय शेअर बाजाराचे पाठबळ असलेल्या या व्यासपीठाद्वारे भागधारकांदरम्यान सुसंवाद वाढवणे, संशोधन आणि नवनिर्मितीला चालना देणे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि सामाजिक घटकांना बाधा पोहोचवणारे वैज्ञानिक हस्तक्षेप यासारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी माहितीची देवाण-घेवाण या व्यासपीठाच्या माध्यमातून होणार आहे.

मंथन व्यासपीठ अद्वितीय असून देशाला परिवर्तनाच्या मार्गावर नेण्यासाठी सृजनशील कल्पना, कल्पक मने आणि सार्वजनिक खाजगी शैक्षणिक सहयोगाच्या माध्यमातून शाश्वत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आधारभूत ठरेल, असं भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद यांनी याबाबत आपलं मत मांडताना सांगितलं.

‘तंत्रज्ञान-प्रेरित लोकांसाठी या तंत्रज्ञान व्यासपीठाच्या उभारणीला सहाय्यभूत ठरणाऱ्या प्रत्येकाला आपण शुभेच्छा देत आहोत.’ अशी भावना भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाचे वैज्ञानिक सचिव डॉक्टर परविंदर मान यांनी यावेळी व्यक्त केली.

 

R.Aghor/S.Naik/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852270) Visitor Counter : 184