संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करताना, आपल्या सशस्त्र दलांना उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज बनवण्यासाठी, क्वांटम कम्युनिकेशन तंत्रज्ञानात झेप घेण्यासाठी संरक्षण मंत्रालय  सज्ज


बंगळुरू-स्थित स्टार्ट-अपचे iDEX अंतर्गत क्वांटम की डिस्ट्रिब्युशन प्रणालीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रगत सुरक्षित संप्रेषण संशोधन

भारतीय लष्कराने यशस्वी चाचण्यांनंतर व्यावसायिक विनंती प्रस्ताव जारी केला

Posted On: 14 AUG 2022 7:03PM by PIB Mumbai

 

देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसाजरा करत असताना स्वदेशी बनावटीच्या आणि अतिप्रगत क्वांटम कम्युनिकेशन तंत्रज्ञानासह आपल्या सशस्त्र दलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुरक्षासज्ज बनवून जागतिक पातळीवरील आघाडीच्या देशांच्या पंक्तीत  सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) - संरक्षण नवोन्मेष संघटना  (DIO) अंतर्गत  QNu लॅब्स या बंगळुरू-स्थित  टेक स्टार्ट-अपने क्वांटम वितरण प्रणालीच्या  (QKD)  माध्यमातून प्रगत सुरक्षित संप्रेषण संशोधनाद्वारे  करून संप्रेषणातील अडथळे दूर केले आहेत.

भारतीय लष्कराच्या मदतीने  iDEX-DIO ने  हा प्रकल्प तयार केला होता.  यशस्वी चाचण्यांनंतर, आता भारतीय लष्कराने QNu लॅबद्वारे विकसित केलेल्या क्वांटम वितरण प्रणालीच्या   खरेदीची प्रक्रिया सुरु  करण्यासाठी व्यावसायिक विनंती प्रस्ताव  (RFP) जारी केला आहे.

लष्करामध्ये  क्वांटम तंत्रज्ञानाच्या  वापरासाठी प्रचंड संधी आहेत तसेच आधुनिक  काळातील युद्धात मोठी हानी घडवू शकण्याची क्षमता असल्याने त्याचा विशेष प्रभाव आहे. QKD अर्थात क्वांटम वितरण प्रणाली टेरेस्ट्रियल ऑप्टिकल फायबरच्या विकासात  ठराविक अंतराने (या संदर्भात 150 किमी पेक्षा जास्त) विभक्त केलेल्या दोन टोकांच्या दरम्यान सिमेट्रिक कीजची  क्वांटम सुरक्षित गुप्त जोडी तयार करायला  अनुमती देते. क्यूकेडी प्रणाली हॅक  करता येणार नाहीत अशा एन्क्रिप्शन की तयार करण्यासाठी एक नॉन-हॅकेबल क्वांटम  चॅनेल तयार करण्यात मदत करते , ज्याचा वापर महत्वपूर्ण  डेटा/व्हॉईस/व्हिडिओ एन्क्रिप्ट करण्यासाठी केला जातो.

स्टार्ट-अपच्या यशाने उत्साहित झालेले  संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी स्वदेशी क्यूकेडी  तंत्रज्ञानाचा विकास हा स्वातंत्र्याच्या  अमृत कालमधील एक मैलाचा दगड आणि आत्मनिर्भर भारतची समर्पक यशोगाथा असल्याचे नमूद केले. सशस्त्र दलांना आधुनिक आणि भविष्यातील  युद्धासाठी नाविन्यपूर्ण संशोधनाने  सुसज्ज  केले जात असल्याबद्दल अशा  तंत्रज्ञानात काम करणाऱ्या iDEX स्टार्ट-अपच्या प्रयत्नांची  त्यांनी प्रशंसा केली. संरक्षण सचिवांनी संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण मंत्रालय, iDEX-DIO, लष्कराचा संरचना विभाग आणि भारतीय सैन्य संदेश  संचालनालय यांचे  देशात प्रथमच उच्च दर्जाच्या  क्वांटम तंत्रज्ञानाच्या विकासात योगदान दिल्याबद्दल  कौतुक केले.  iDEX संरक्षण संशोधनात  क्रांती घडवून आणत आहे  आणि अगदी कमी खर्च आणि वेळेत अभिनव तंत्रज्ञान संबंधी संशोधनात  मदत करत आहे.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1851844) Visitor Counter : 352


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi