वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

"हर घर तिरंगा" महोत्सवानिमित्त केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी फडकवला राष्ट्रध्वज

Posted On: 13 AUG 2022 5:01PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले  की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी "हर घर तिरंगा" ही मोहीम साजरी करत असताना आपण "भारताला स्वावलंबी बनवण्याची आणि भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देण्याची", स्वदेशीचा संदेश देणारी शपथ घेऊया..

गोयल यांनी 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत साजरा केल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा महोत्सवानिमित्त, गांधी दर्शन, राजघाट येथे राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राला भेट दिली आणि 2 ऑक्टोबर 2019 रोजी भारताने साध्य केलेला "उघड्यावरील शौचापासून मुक्त देशाचा" दर्जा मिळवण्यापर्यंतचा  प्रवास दाखवणाऱ्या डिजिटल प्रदर्शनालाही भेट दिली.

या कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपस्थित  जनसमुदायाला "हर घर तिरंगा" ही प्रतिज्ञा देखील दिली. याच कार्यक्रमात त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. भारताला जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यानंतर  गोयल यांनी वाणिज्य भवनात उभारलेल्या फाळणीचा थरारक अनुभव देणाऱ्या एका प्रदर्शनालाही भेट दिली.

***

S.Kane/G.Deoda/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1851544) Visitor Counter : 120


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil