माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच्या  आकाशवाणी सोबतच्या आठवणी आणि जादुई क्षण

Posted On: 13 AUG 2022 4:04PM by PIB Mumbai

 

ही आकाशवाणी आहे. ...आपल्याला बातम्या देत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेली 75 वर्षे भारताची  सर्वात मोठी  सार्वजनिक प्रसारण सेवा असलेली आकाशवाणी देशभरातील 130 कोटी नागरिकांना अविरत लौकिक कथा सांगत  आहे.

ऑल इंडिया रेडिओ आझाद भारत की बात --- आकाशवाणी के साथया अनोख्या  कार्यक्रमासह स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.  15 ऑगस्ट 2022 पासून, 90 सेकंदाची ही मालिका 100.1FM GOLD चॅनल, मुख्य बातमीपत्रे आणि सोशल मीडियासह आकाशवाणीच्या इतर सर्व प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाईल.  ऑल इंडिया रेडिओ- द व्हॉईस ऑफ नेशनच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमधील जीवनाच्या  विविध क्षेत्रांमधला  भारताचा प्रवास उलगडला जाईल.

यामध्ये महात्मा गांधी, होमी जहांगीर भाभा, सर सी.व्ही.रमण , डॉ. कुरियन वर्गीस, डॉ. एम एस स्वामिनाथन, पंडित भीमसेन जोशी, मेलविन डी मेलो, जसदेव सिंग यांसारख्या  दिग्गजांचे आवाज ऐकता येतील.  आकाशवाणीच्या सोशल मीडिया हँडलवर इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर दररोज एक विशेष कथा प्रसारित आणि अपलोड केली जाईल. @AkashvaniAir आणि @airnewsalerts Twitter, newsonairofficial YouTube चॅनल, newssonair.gov.in , NewsonAir अॅप, Facebook आणि Instagram वर ऐकता येईल.

***

S.Kane/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1851531) Visitor Counter : 221