आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 207 कोटी


71 लाख पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या.
12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 3 कोटी  97 लाखांहून अधिक पाहिली मात्रा देण्यात आली.

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 1,19,264

गेल्या 24 तासांत देशात 15,815 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.54%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.79% आहे

Posted On: 13 AUG 2022 12:18PM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 207.71 कोटींचा (2,07,71,62,098) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,75,92,966 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 97 लाखांहून अधिक (3,97,17,969) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10412972

2nd Dose

10098080

Precaution Dose

6530107

FLWs

1st Dose

18432711

2nd Dose

17683958

Precaution Dose

12696024

Age Group 12-14 years

1st Dose

39717969

2nd Dose

29056266

Age Group 15-18 years

1st Dose

61444491

2nd Dose

51709343

Age Group 18-44 years

1st Dose

559998781

2nd Dose

510788919

Precaution Dose

39013299

Age Group 45-59 years

1st Dose

203787996

2nd Dose

195766351

Precaution Dose

24104293

Over 60 years

1st Dose

127508693

2nd Dose

122354870

Precaution Dose

36056975

Precaution Dose

11,84,00,698

Total

2,07,71,62,098

 


भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,19,264 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.27% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.54% झाला आहे. गेल्या 24 तासांत 20,018 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,35,93,112 झाली आहे.


गेल्या 24 तासांत, देशात नव्या 15,815 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.


गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 3,62,802 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 87कोटी 99 लाखांहून अधिक (87,99,00,242) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.79% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 4.36%. इतका नोंदला गेला आहे.


***


Jaydevi PS/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1851472) Visitor Counter : 150