सांस्कृतिक मंत्रालय

अनुराग ठाकूर आणि जी. किशन रेड्डी उद्या नवी दिल्ली येथे ‘बढे चलो’ च्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहणार

Posted On: 11 AUG 2022 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2022

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत सांस्कृतिक मंत्रालयाने 5 ऑगस्ट 2022 पासून बढे चलो हा उपक्रम  आयोजित केला आहे. भारतातील 70 शहरांमधील 7 दिवसांच्या उत्साहाने भरलेल्या सादरीकरणानंतर, उद्या तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे संध्याकाळी 6:30 वाजता होणार्‍या दिमाखदार सोहोळ्यात त्याची सांगता होईल.

बढे चलो हा सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकल्पनेतून साकारलेला  एक युवा-केंद्रित उपक्रम असून तरुणांच्या हृदयात देशाप्रती प्रेमाची भावना निर्माण करणे हा त्या मागचा उद्देश आहे.  इंडियन आयडॉल्स पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या सादरीकरणासह तारे-तारकांची उपस्थिती असलेला हा एक नेत्रदीपक सोहळा असेल. माहिती आणि प्रसारण मंत्री व  युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, तर ईशान्य क्षेत्राचे सांस्कृतिक, पर्यटन आणि विकास मंत्री जी. किशन रेड्डी यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. 

पंतप्रधानांच्या घोषणेनंतर देशभरात हर घर तिरंगा चा उत्साह वाढत असताना, बढे चलोच्या जल्लोषात पूर्वेकडील इटानगर, दिमापूर, इम्फाळपासून पश्चिमेला वाघा बॉर्डर, सुरत, गोवा, दमणपर्यंत तसेच उत्तरेला श्रीनगर आणि जम्मूपासून दक्षिणेला चेन्नई आणि बेंगळुरूपर्यंत, तसेच अगदी दमण आणि पोर्ट ब्लेअर सारख्या दुर्गम ठिकाणी देखील जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणावर नोंदवला गेला. 

बढे चलो चळवळीला आपल्या देशातील तरुणांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला, जो त्यांनी सादर केलेल्या गाणी आणि नृत्यामधून प्रतिध्वनीत होतो. वाघा बॉर्डरचा कार्यक्रम प्रेक्षणीय आणि लक्षात ठेवण्यासारखा होता. अनेक  ठिकाणी, लोक उत्स्फूर्तपणे नृत्यात  सामील झाले आणि त्यामुळे सादरीकरण  आणखीच प्रेक्षणीय झाले . बढे चलो गीताला तरुण आणि वृद्धांसह सर्वांनी दाद दिली आहे. हा कार्यक्रम सर्वांच्या मनात देशप्रेमाची भावना  अधिक  प्रज्वलित करेल तसेच  राष्ट्राभिमान वाढवून गर्वाने आमचे मस्तक उंचावेल आणि 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करेल.

LOCATION – IMPHAL

LOCATION – WAGAH BORDER

LOCATION – CHENNAI

LOCATION – ITANAGAR

 

S.Kulkarni/Shraddha/Rajashree/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1851089) Visitor Counter : 127