वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत- युके मुक्त व्यापार करारासाठीच्या चर्चेची पाचवी फेरी संपन्न
Posted On:
11 AUG 2022 12:48PM by PIB Mumbai
भारत आणि इंग्लंड (युके) दरम्यानच्या मुक्त व्यापार करारासाठीच्या (एफटीए) चर्चेची पाचवी फेरी 29 जुलै 2022 रोजी संपली. वाटाघाटींमधे सहभागी अधिकार्यांनी समिश्र माध्यमातून या तांत्रिक चर्चेत भाग घेतला – काही पथके भारतात नवी दिल्ली इथल्या बैठकीत थेट सहभागी झाले तर बहुतांश अधिकाऱ्यांनी दूरदृश्य माध्यमातून भाग घेतला. वाटाघाटीच्या या फेरीसाठी 15 धोरण क्षेत्रांचा समावेश असलेल्या 85 स्वतंत्र सत्रांमध्ये मसुदा कराराच्या मजकूरावर तपशीलवार चर्चा करण्यासाठी दोन्ही बाजूंचे तांत्रिक तज्ज्ञ एकत्र आले. भारत आणि ब्रिटनचे अधिकारी ऑक्टोबर 2022 च्या अखेरीस आपल्या लक्ष्याच्या दिशेने अर्थात सर्वसमावेशक आणि संतुलित मुक्त व्यापार करारावरील बहुतांश चर्चा पूर्ण करण्यासाठी पूर्ण सत्रात काम करणार आहेत.
***
ST/Vinayak/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1850855)
Visitor Counter : 271