राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
Posted On:
10 AUG 2022 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
''रक्षा बंधनानिमित्त मी सर्व देशवासीयांना शुभेच्छा देते.
रक्षाबंधन म्हणजे बहिणींचे त्यांच्या भावांवरील प्रेम आणि आपुलकीची अभिव्यक्ती आहे. बहीण भावातील अतूट बंधन पुन्हा एकदा व्यक्त करण्याची रक्षाबंधन ही एक संधी आहे. रक्षाबंधन हे उत्स्फूर्त प्रेम आणि परस्पर संबंधाचे प्रतीक आहे आणि हा सण लोकांना जवळ आणतो. भाऊ-बहिणींच्या परस्पर विश्वासाचा हा सण आपल्या समाजात सौहार्द आणि महिलांबद्दलचा आदर वाढण्यासाठी प्रेरणादायी ठरो.''
हिंदी संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा
S.Kulkarni/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1850626)
Visitor Counter : 159