संसदीय कामकाज मंत्रालय
18 जुलै रोजी सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन, 2022 आज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पाच विधेयके मंजूर
लोकसभेत सहा विधेयके मांडण्यात आली; लोकसभेने 7 विधेयके तर राज्यसभेने 5 विधेयके मंजूर केली
Posted On:
08 AUG 2022 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2022
सोमवार, 18 जुलै, 2022 रोजी सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन, 2022 सोमवार 8 ऑगस्ट, 2022 रोजी अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात 22 दिवसांच्या कालावधीत 16 बैठका झाल्या.
18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत एकूण 18 बैठका घेण्याचे नियोजित होते, मात्र अत्यावश्यक शासकीय कामकाज पूर्ण झाल्यामुळे तसेच आगामी दोन राजपत्रित आणि सरकारी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सदस्यांची मागणी लक्षात घेऊन अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला.
अधिवेशनादरम्यान लोकसभेत 6 विधेयके मांडण्यात आली. लोकसभेने 7 विधेयके आणि राज्यसभेने 5 विधेयके मंजूर केली. लोकसभेच्या सुट्टीमुळे एक विधेयक मागे घेण्यात आले. अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांनी एकूण 5 विधेयके मंजूर केली.
अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेली काही प्रमुख विधेयके खालीलप्रमाणे:
- कौटुंबिक न्यायालये (सुधारणा) विधेयक, 2022
- सामूहिक विनाशाची शस्त्रे आणि त्यांची वितरण प्रणाली (बेकायदेशीर कारवायांना प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2022,
- भारतीय अंटार्क्टिका विधेयक, 2022
- राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी विधेयक, 2021
- केंद्रीय विद्यापीठे (दुरुस्ती) विधेयक, 2022
- लोकसभेत मांडण्यात आलेली विधेयके, लोकसभेने मंजूर केलेली विधेयके, राज्यसभेने मंजूर केलेली विधेयके आणि दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेली विधेयके यांची सूची परिशिष्टात जोडली आहे.
अल्प कालीन चर्चा:
- लोकसभेत, नियम 193 अन्वये महागाईवर एक अल्पकालीन चर्चा झाली.
- लोकसभेत भारतातील खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज आणि त्यासंदर्भात सरकारने उचललेली पावले यावर गौरव गोगोई यांनी 31 मार्च 2022 रोजी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर पुढील चर्चा घेण्यात आली मात्र ती पुन्हा अनिर्णायक राहिली.
- राज्यसभेत, अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींबाबत नियम 176 अंतर्गत एक अल्पकालीन चर्चा झाली.
लोकसभेत सुमारे 48% तर राज्यसभेत सुमारे 44% कामकाज झाले.
LEGISLATIVE BUSINESS TRANSACTED DURING THE 9TH SESSION OF 17TH LOK SABHA AND 257TH SESSION OF RAJYA SABHA (MONSOON SESSION)
I – BILLS INTRODUCED IN LOK SABHA
- The Family Courts (Amendment) Bill, 2022
- The Central Universities (Amendment) Bill, 2022
- The Energy Conservation (Amendment) Bill, 2022
- The New Delhi International Arbitration Centre (Amendment) Bill, 2022
- The Competition (Amendment) Bill, 2022
- The Electricity (Amendment) Bill, 2022.
II – BILLS PASSED BY LOK SABHA
- The Indian Antarctic Bill, 2022
- The Family Courts (Amendment) Bill, 2022
- The National Anti-Doping Bill, 2021
- The Wild Life (Protection) Amendment Bill, 2021
- The Central Universities (Amendment) Bill, 2022
- The Energy Conservation (Amendment) Bill, 2022
- The New Delhi International Arbitration Centre (Amendment) Bill, 2022
III – BILLS PASSED BY RAJYA SABHA
- The Weapons of Mass Destruction and their Delivery Systems (Prohibition of Unlawful Activities) Amendment Bill, 2022
- The Indian Antarctic Bill, 2022
- The National Anti-Doping Bill, 2021
- The Family Courts (Amendment) Bill, 2022
- The Central Universities (Amendment) Bill, 2022
IV – BILLS PASSED BY BOTH THE HOUSES OF PARLIAMENT
- The Weapons of Mass Destruction and their Delivery Systems (Prohibition of Unlawful Activities) Amendment Bill, 2022
- The Indian Antarctic Bill, 2022
- The National Anti-Doping Bill, 2021
- The Family Courts (Amendment) Bill, 2022
- The Central Universities (Amendment) Bill, 2022
V – BILL WITHDRAWN IN LOK SABHA
- The Personal Data Protection Bill, 2019
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1850062)
Visitor Counter : 424