युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या 8 व्या दिवशी भारताची तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह सहा पदकांची कमाई


बजरंग पुनिया, दीपक पुनिया आणि साक्षी मलिक यांनी जिंकलं सुवर्ण, अंशू मलिकने पटकावले रौप्य आणि दिव्या काकरन आणि मोहित ग्रेवाल यांनी जिंकले कांस्य पदक.

Posted On: 06 AUG 2022 11:50AM by PIB Mumbai

महत्वाचे मुद्दे:

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्यांचे त्यांच्या असाधारण कामगिरीसाठी अभिनंदन केले आहे.

सर्वोत्तम कौशल्याचे प्रदर्शन करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन: अनुराग ठाकूर

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या 8व्या दिवशी भारतीय कुस्ती चमूने असाधारण कामगिरी करत, सहा पदकांची कमाई केली आहे, ज्यात तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदक पटकावले आहेत. बजरंग पुनियाने पुरुषांच्या फ्री स्टाईल 65 किलो गटात, दीपक पुनियाने पुरुषांच्या फ्री स्टाईल 86 किलो गटात आणि साक्षी मलिकने महिलांच्या फ्री-स्टाईल 62 किलो कुस्ती गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. अंशू मलिकने महिलांच्या फ्री-स्टाईल 57 किलो कुस्ती गटात, तर दिव्या काकरन यांनी रौप्य पदक पटकावले तर, मोहित ग्रेवाल याने पुरुषांच्या फ्री स्टाईल 125 किलो कुस्ती गटात कांस्य पदक मिळविले आहे. आता भारताच्या पदकांची संख्या 26 झाली आहे, ज्यात 9 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय नागरिकांनी पदक विजेत्यांचे या कामगिरीसाठी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुस्ती चमूचे पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. राष्ट्रपती आपली ट्वीटमध्ये म्हणाल्या, “#CommonwealthGames मध्ये साक्षी मलिकने कुस्ती स्पर्धेत  ऐतिहासिक सुवर्ण पदक पटकावले. तिने कठीण आव्हान परतवून लावत भारतीयांची मान अभिमानाने उंच केली आहे. तू तरुणांसाठी, विशेषतः मुलींसाठी रोल मॉडेल आहेस. तुझे मनापासून अभिनंदन!”

***

MC/Radhika/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1849072) Visitor Counter : 179