सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल 150 स्मारकांवर राष्ट्रध्वज फडकावून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) साजरा करणार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’

प्रविष्टि तिथि: 05 AUG 2022 8:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2022

 

स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल, हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) या देशभक्तीपर अभियाना अंतर्गत, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभाग देशभरातील 150 स्मारके/स्थळांवर राष्ट्र ध्वज फडकवणार आहे. राष्ट्रध्वज फडकावण्याबरोबर या स्मारकांवर तीन रंगांमधील रोषणाई देखील केली जाईल. देशभरातील 750 स्मारकांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशभरातील सर्व केंद्रीय संरक्षित स्मारकांमध्ये मोफत प्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व विभागाची 37 मंडळे लोकसहभागाच्या भावनेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला मूर्त रूप देण्याच्या उद्देशाने स्थानिक जनतेचा सहभाग असलेले विविध कार्यक्रम आयोजित करतील. या कार्यक्रमांमध्ये वृक्षारोपण अभियान, शाळा संवाद, व्याख्याने, आरोग्य शिबिरे आणि लहान मुलांच्या जागृतीचे कार्यक्रम याचा समावेश आहे. 

 

  S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1848903) आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , Telugu , English , हिन्दी