ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

11 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रायोगिक तत्वावर शिधा पत्रिका सामायिक नोंदणी सुविधेचा शुभारंभ


या वेब आधारित नोंदणी प्रक्रियेमुळे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांसह राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एन एफ एस ए) अंतर्गत शिधापत्रिकेसाठी नावनोंदणी करायला उत्सुक असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याकरता सुविधा उपलब्ध

Posted On: 05 AUG 2022 7:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2022

 

महाराष्ट्र,आसाम, गोवा, लक्षद्वीपमणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, त्रिपुरा आणि उत्तराखंड या 11 राज्य / केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रायोगिक तत्वावर शिधा पत्रिका सामायिक नोंदणी सुविधेचा शुभारंभ आज अन्न आणि  सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव  सुधांशू पांडे यांच्या हस्ते झाला.

या वेब आधारित नोंदणी प्रक्रियेमुळे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांसह राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एन एफ एस ए) अंतर्गत शिधापत्रिकेसाठी नावनोंदणी करायला उत्सुक असलेल्या नागरीकांची माहिती संकलित करण्याकरता सुविधा उपलब्ध झाली आहे.

या सुविधेमुळे राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एन एफ एस ए) च्या कमाल मर्यादेच्या अधीन राहून त्यांच्या स्थापन केलेल्या समावेशन आणि वगळण्याच्या निकषांनुसार,  (एन एफ एस ए) अंतर्गत नोंदणी करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची त्वरित ओळख करून त्यांच्या पडताळणीकरता आणि योग्य पद्धतीने लाभांचे उद्दिष्ट साध्य करण्याकता सहाय्य होईल.

हे पोर्टल राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना  (एन एफ एस ए) अंतर्गत  लाभार्थ्यांचा  समावेश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास सक्षम करणारे आहे." असे सुधांशू पांडे यांनी सांगितले. हे पोर्टल माहिती व्यवस्थापनात एकसूत्रीपणा आणेल आणि राज्य/ केंद्रशासित प्रदेशांना लाभार्थ्यांचा समावेश करण्यासाठी मदत करेल, यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 (एन एफ एस ए) देशातील जास्तीत जास्त 81.35 कोटी लोकांसाठी अन्न सुरक्षा कवच प्रदान करते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 (एन एफ एस ए) अंतर्गत जारी केलेल्या या विभागाच्या लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) आदेश, 2015 अंतर्गत एन एफ एस ए (अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबांसह) अंतर्गत समाविष्ट असलेल्या एकूण व्यक्तींची राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार स्पष्टपणे व्याख्या करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर सद्यस्थितीत  एन एफ एस ए  अंतर्गत असलेले लाभार्थ्यांचे प्रमाण  81.35 कोटींच्या एकूण कमाल मर्यादेच्या तुलनेत सुमारे 79.74 कोटी आहे.

सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेशांना विशेष शिबिरे आणि नागरिकांची ओळख सिद्ध करण्यासाठी विशेष मोहिमा यांचे आयोजन करून अधिकाधिक पात्र आणि डावललेल्या व्यक्तींना शोधण्याची आणि त्यांच्या  पात्रतेनुसार आणि संबंधित कमाल मर्यादेपर्यंत त्यांचा समावेश एन एफ एस ए अंतर्गत (अंत्योदय अन्न योजना / प्राधान्य कुटुंब योजना) करण्याची तसेच नियमितपणे अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याची  सूचना दिली जात आहे.

 

S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1848891) Visitor Counter : 170


Read this release in: Urdu , Hindi , Kannada , English