आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने केला एकूण 205.59 कोटी लसीच्या मात्रांचा टप्पा पार


12 ते 14 वयोगटातील किशोरांना 3.93 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशातील उपचाराधीन रूग्णसंख्या सध्या 1,35,364

गेल्या 24 तासात, 20,551 नवीन रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.50 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.64 टक्के

Posted On: 05 AUG 2022 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2022

 

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 205.59 कोटीहून (2,05,59,47,243) अधिक मात्रांचा टप्पा पार केला आहे आणि एकूण 2,72,54,426 सत्रांतून हे साध्य केले आहे.

12 ते 14 वर्षे वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.93 कोटी (3,93,33,226) पौगंडावस्थेतील मुलांना कोविड-19 ची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 ची वर्धित मात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

आज सकाळी सात वाजता उपलब्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकत्रित आकडेवारीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10412324

2nd Dose

10092736

Precaution Dose

6410621

FLWs

1st Dose

18431464

2nd Dose

17675629

Precaution Dose

12438028

Age Group 12-14 years

1st Dose

39333226

2nd Dose

28452471

Age Group 15-18 years

1st Dose

61302501

2nd Dose

51334209

Age Group 18-44 years

1st Dose

559697429

2nd Dose

509541303

Precaution Dose

29224418

Age Group 45-59 years

1st Dose

203718906

2nd Dose

195447698

Precaution Dose

18910030

Over 60 years

1st Dose

127461823

2nd Dose

122145228

Precaution Dose

33917199

Precaution Dose

10,09,00,296

Total

2,05,59,47,243

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 1,35,364 इतकी आहे. एकूण कोविड रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचं प्रमाण   0.31% इतके आहे.

परिणामी, भारतात रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 98.50 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात, 21,595 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महामारीच्या आरंभापासून) आता 4,34,45,624 इतकी आहे.

गेल्या 24 तासात, 20,551 नवीन कोविड रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात, 4,00,110 कोविड चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 87.71 कोटी (87,71,60,646) एकूण चाचण्या घेतल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.64 टक्के इतका आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 5.14 टक्के इतका नोंदवला गेला आहे.

 

 

 

S.Tupe /S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1848735) Visitor Counter : 134