युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ब्रिक्स युथ कॅम्पच्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटन1 सोहळ्यात सहभागी युवक आणि ब्रिक्स देशांमधील अधिकृत प्रतिनिधींना केले संबोधित
Posted On:
04 AUG 2022 10:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2022
ब्रिक्स युथ कॅम्पच्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी युवक आणि, ब्रिक्स देशांमधील अधिकृत प्रतिनिधींना 2 ऑगस्ट 22 रोजी केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.

जगातल्या युवकांमध्ये चिरस्थायी संबंधन निर्माण करणे याला प्रधानमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्राधान्य आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरनमेंट(LiFE) या अभियानाबद्दल त्यांनी माहिती दिली. युवकांनी एकत्र यावं आणि लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरनमेंट हे अभियान एका चळवळीप्रमाणे पुढे न्यावे,जेणेकरून पर्यावरण संवेदी जीवनशैली निर्माण करण्यासाठी एक लोक चळवळ निर्माण होईल असे आवाहन पंतप्रधानांनी केल्याचं त्यांनी सांगितलं. परस्पर संवादातून दोन पिढ्यांमध्ये संबंध आणि परस्परांमधले ज्ञान सदैव जिवंत ठेवावे यावर त्यांनी यावेळी भर दिला. ब्रिक्स आंतरराष्ट्रीय युथ कॅम्पचे हे दुसरे पर्व अधिक फलदायी ठरावे यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
S.Patil/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1848558)
Visitor Counter : 148