नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह यांनी आपल्या वरिष्ठ शिष्टमंडळासोबत दिली जे एन पी ए ला भेट

प्रविष्टि तिथि: 04 AUG 2022 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2022

 

मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष मोहम्मद सोलीह यांनी मालदीव प्रजासत्ताकाच्या वरिष्ठ  शिष्टमंडळा सोबत जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला भेट दिली.

यावेळी  जे एन पी ए चे अध्यक्ष संजय शेट यांनी मालदीव प्रजासत्ताकाचे अध्यक्ष माननीय  इब्राहिम मोहम्मद सोलिह  यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी जे एन पी ए चे उपाध्यक्ष उमेश शरद वाघ ,त्याचबरोबर जे एन पी ए चे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते

यावेळी जे एन पी ए च्या अध्यक्षांनी जे एन पी ए च्या विविध प्रकल्पांबाबत अध्यक्षांना माहिती दिली. जेएनपीएच्या आत्ताच्या विकासात्मक प्रकल्पांबाबत सांगताना ते म्हणाले की,सरकारच्या संकल्पनेतून जेएनपीए ने विविध विकासात्मक प्रकल्प हाती घेतले आहेत,यात वाढवण इथे विकसित होत असलेला हरित बंदर प्रकल्प त्याचबरोबर राज्याच्या किनारी भागात उभे राहणारे शुष्क बंदर, चौथे कंटेनर टर्मिनल आदींचा समावेश आहे. या विकास कामांचा देशाच्या वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला नक्कीच  फायदा मिळणार आहे.

यावेळी  इब्राहिम मोहम्मद सोलीह यांनी जेएनपीएच्या एका बंदर टर्मिनल जी टी आय ला भेट दिली आणि या बंदराच्या एकंदरित कामकाजाची माहिती घेतली.

 

S.Patil/V.Yadav/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1848552) आगंतुक पटल : 152
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी