सांस्कृतिक मंत्रालय
नॅशनल व्हर्च्युअल लायब्ररी ऑफ इंडिया (NVLI), मध्ये एकूण 3.04 लाख डिजिटल कलाकृती आणि 34.91 लाखांपेक्षा जास्त संदर्भ सूची नोंदी आहेत: जी. किशन रेड्डी
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2022 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2022
भारताचा सर्व प्रकारच्या मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा सर्वासमोर आणण्यासाठी 10.12.2019 रोजी भारतीय संस्कृती पोर्टल म्हणून नॅशनल व्हर्च्युअल लायब्ररी सुरु करण्यात आली आहे. URL https://indianculture.gov.in आहे जो सार्वजनिक डोमेनवर उपलब्ध आहे. पोर्टलची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे:
- यात मेटाडेटासह एकूण 3.04 लाख डिजिटल कलाकृती आहेत. तसेच 34.91 लाखांहून अधिक संदर्भ सूचीच्या नोंदी आहेत.
- 18 श्रेणींमध्ये ही सामग्री सादर केली आहे, उदा. दुर्मिळ पुस्तके, ई-पुस्तके, अभिलेखागार, राजपत्रे आणि गॅझेटियर्स, हस्तलिखिते, संग्रहालयातील संग्रह, चित्रे, ऑडिओ, अमूर्त सांस्कृतिक वारसा, फोटो संग्रह, प्रतिमा, व्हिडिओ, युनेस्को मधील आशय , संशोधन दस्तावेज, भारतीय राष्ट्रीय संदर्भ सूची, अहवाल आणि कार्यवाही, केंद्रीय कॅटलॉग आणि इतर कॅटलॉग.
- यात सर्जनशील लेखनाच्या 12 श्रेणी देखील आहेत- कथा, किस्से , फोटो निबंध, भारतातले किल्ले, भारतातील वस्त्रप्रावरणे आणि कापड , भारताची ऐतिहासिक शहरे, भारताची सांगितिक वाद्ये, खाद्य आणि संस्कृती, व्हर्च्युअल वॉकथ्रू, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक , अजिंठा लेणी आणि ईशान्य प्रदेशाचा संग्रह.
- हे पोर्टल सध्या इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे.
- इंडियन कल्चर नावाच्या अॅपद्वारे पोर्टलवर जाता येईल ,जे अँड्रॉइड फोन आणि आयफोन दोन्हीवर उपलब्ध आहे.
- उमंग अॅपच्या माध्यमातून पोर्टल उपलब्ध आहे.
- सर्व संस्था नियमितपणे संदर्भ सूची आणि डिजिटल संसाधने भारतीय संस्कृती पोर्टलवर एकत्रीकरणासाठी राष्ट्रीय व्हर्चुअल ग्रंथालयाकडे हस्तांतरित करतील हे मंत्रालयाने सुनिश्चित केले आहे.
देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय संस्कृती पोर्टलच्या प्रचारासाठी नॅशनल व्हर्च्युअल लायब्ररी ऑफ इंडिया अंतर्गत संपर्क पथक तयार करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती पोर्टलच्या (NVLI प्रकल्प) प्रचारासाठी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये दररोज सादरीकरण, कार्यक्रम आदींचे आयोजन केले जात आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी.किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1848500)
आगंतुक पटल : 239