सांस्कृतिक मंत्रालय
केंद्र सरकार अभिमत विद्यापीठ म्हणून ‘भारतीय वारसा संस्था ’स्थापन करणार
Posted On:
04 AUG 2022 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2022
केंद्र सरकारने उत्तर प्रदेशच्या नोएडा मधील गौतम बुद्ध नगर येथे विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) विनियम 2019 नुसार अभिमत विद्यापीठ म्हणून ‘भारतीय वारसा संस्था ’स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय वारसा आणि संवर्धनाच्या क्षेत्रात उच्च शिक्षण आणि संशोधनाची संधी देणारे हे अशा प्रकारचे देशातील अनोखे विदयापीठ असेल आणि देशात अशा आणखी संस्था निर्माण करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी.किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1848490)
Visitor Counter : 165