आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने केला 205.22 कोटी लसीच्या मात्रांचा टप्पा पार


12 ते 14 वयोगटातील किशोरांना 3.92 कोटीहून अधिक पहिली लस मात्रा देण्यात आली

देशातील उपचाराधीन रूग्णसंख्या सध्या 1,36,478

गेल्या 24 तासात, 19,893 नवीन रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.50 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 4.64 टक्के

Posted On: 04 AUG 2022 9:48AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 205.22कोटीहून (2,05,22,51,408) अधिक मात्रांचा टप्पा पार केला आहे आणि एकूण 2,72,07,336 सत्रांतून हे साध्य केले आहे.


12 ते14 वर्षे वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.92 कोटी (3,92,26,460) पौगंडावस्थेतील मुलांना कोविड-19 चा पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 ची वर्धित मात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.


आज सकाळी सात वाजता उपलब्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकत्रित आकडेवारीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.


 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10412237

2nd Dose

10092108

Precaution Dose

6391525

FLWs

1st Dose

18431226

2nd Dose

17674525

Precaution Dose

12391832

Age Group 12-14 years

1st Dose

39226460

2nd Dose

28277362

Age Group 15-18 years

1st Dose

61264752

2nd Dose

51228469

Age Group 18-44 years

1st Dose

559649322

2nd Dose

509307866

Precaution Dose

27624044

Age Group 45-59 years

1st Dose

203710113

2nd Dose

195396195

Precaution Dose

18061558

Over 60 years

1st Dose

127455852

2nd Dose

122111015

Precaution Dose

33544947

Precaution Dose

9,80,13,906

Total

2,05,22,51,408

 


भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या1,36,478 इतकी आहे. देशातील पाॅझिटीव्ह रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रूग्णांची टक्केवारी 0.31 टक्के इतकी आहे.


परिणामी, भारतात रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 98.50 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात, 20,419 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महामारीच्या आरंभापासून) आता 4,34,24,029 इतकी आहे.



गेल्या 24 तासात, 19,893 नवीन कोविड रूग्णांची नोंद झाली आहे.



गेल्या 24 तासात, 4,03,006 कोविड चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 87.67 कोटी (87,67,60,536) चाचण्या घेतल्या आहेत.


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.64 टक्के इतका आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.94 टक्के इतका नोंदवला गेला आहे.


***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1848229) Visitor Counter : 203