शिक्षण मंत्रालय
लोकसभेने केंद्रीय विद्यापीठे (दुरुस्ती), विधेयक 2022 केले मंजूर
Posted On:
03 AUG 2022 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2022
लोकसभेने आज केंद्रीय विद्यापीठे (दुरुस्ती) विधेयक मंजूर केले. राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्थेचे (NRTI) रूपांतर गति शक्ती विद्यापीठ (GSV) या केंद्रीय विद्यापीठात करणारे हे विधेयक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच भविष्याची दृष्टी ठेवून काम करतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चौथ्या औद्योगिक क्रांतीचा स्वीकार करण्यासाठी भविष्यासाठी सज्ज कार्यशक्ती तयार होते आणि 21 व्या शतकातील आव्हाने तयार होत आहेत, असे लोकसभेत केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या तांत्रिक विकासाबद्दलही माहिती दिली. 2022 पर्यंत भारत सीमा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रस्ते, रेल्वे, जहाजबांधणी, विमान वाहतूक आदींसह पायाभूत सुविधा आणि वाहतूक क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनांबद्दल त्यांनी सांगितले. देशभरात लहान शहरांमध्ये वाहतूक क्षेत्रांची वाढ, विमानतळांची उभारणी आणि हवाई वाहतूक वाढणे हे त्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे, असे त्यांनी नमूद केले. वाहतूक क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनांमध्ये ज्ञानाचे भांडार तयार करण्यासाठी संस्था तयार करणे, संशोधन करणे, सर्वोत्तम पद्धती तयार करणे, कौशल्य विकास सुलभ करणे, क्षमता वाढीसाठी काम करणे आणि वाहतूक क्षेत्राच्या वाढीस सुलभता देणे आवश्यक आहे. भविष्यातील विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित (STEM) या व्यतिरिक्त पर्यावरण, वाणिज्य आणि सामाजिक शास्त्रांबद्दल शिकण्याची आवश्यकता आहे, अशा प्रकारे गती शक्ती विद्यापीठ नावाच्या जागतिक दर्जाच्या, बहु-विद्याशाखीय, बहुआयामी भविष्यवादी संस्थेची कल्पना करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
* * *
S.Kane/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1848106)
Visitor Counter : 263