पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रामसर स्थळांच्या यादीत आणखी 10 पाणथळ जागांच्या समावेशामुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 64 वर

प्रविष्टि तिथि: 03 AUG 2022 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑगस्‍ट 2022

 

रामसर स्थळांच्या यादीत 10 पाणथळ जागांच्या समावेशामुळे भारतात आता 12,50,361 हेक्टर क्षेत्रफळ असलेली एकूण 64 रामसर  स्थळे झाली  आहेत. या 10 नवीन स्थळांपैकी   तामिळनाडूत 6 तर गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओडिशात प्रत्येकी एक  स्थळ आहे. या स्थळांच्या निवडीमुळे पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि व्यवस्थापन तसेच त्यांच्या संसाधनांचा सुज्ञ वापर करण्यात मदत होईल.

1971 मध्ये रामसर इराण येथे रामसर करार झाला. त्यावर भारताने 1 फेब्रुवारी 1982 रोजी त्यावर स्वाक्षरी केली. आतापर्यंत 12,50,361 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या 64 पाणथळ जागा भारताने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या रामसर स्थळे म्हणून घोषित केल्या आहेत.

रामसर स्थळे म्हणून घोषित  नवीन 10 पाणथळ जागा पुढीलप्रमाणे: 

  1. कुंथनकुलम पक्षी अभयारण्य, तामिळनाडू
  2. सातकोसिया घाट, ओडिशा
  3. नंदा तलाव, गोवा
  4. मन्नार मरीन बायोस्फीअर रिझर्व्हचे आखात, तामिळनाडू
  5. रंगनाथिटू बीएस, कर्नाटक
  6. वेंबन्नूर वेटलँड कॉम्प्लेक्स, तामिळनाडू
  7. वेल्लोड पक्षी अभयारण्य, तामिळनाडू
  8. सिरपूर वेटलँड, मध्य प्रदेश
  9. वेदांतंगल पक्षी अभयारण्य, तामिळनाडू
  10. उदयमार्थंडपुरम पक्षी अभयारण्य, तामिळनाडू

* * *

S.Kane/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1848070) आगंतुक पटल : 2878
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Odia