वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमांतर्गत 2019-20 ते 2022-23 (30.06.2022 पर्यंत) राज्ये/राज्य संस्थांना 16,854.84 लाखांची आर्थिक मदत

Posted On: 03 AUG 2022 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑगस्‍ट 2022

 

वस्त्रोद्योग मंत्रालय हातमागांच्या विकासासाठी आणि विणकरांच्या कल्याणासाठी देशभरात राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम राबवत आहे.

या योजनेअंतर्गत राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या आधारे, राज्य हातमाग एजन्सी आणि हातमाग सहकारी संस्था/विणकरांसह पात्र हातमाग एजन्सींना पायाभूत सुविधांचा विकास, अपग्रेडेड लूम आणि उपकरणे खरेदी करणे, सौर प्रकाश व्यवस्था यांच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते. 2019-20 ते 2022-23 (30.06.2022 पर्यंत) गेल्या तीन वर्षात आणि चालू वर्षात युनिट्स, वर्कशेड्सचे बांधकाम, डिझाइन इनोव्हेशन, उत्पादन विकास आणि विविधीकरण, क्षमता वाढ, हातमाग उत्पादनांचे विपणन, सवलतीच्या दरात मुद्रा कर्ज इ. साठी देशात एकूण 31,094 विणकरांना यंत्रमाग आणि उपकरणे पुरविण्यात आली आहेत.

राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमांतर्गत 2019-20 ते 2022-23 (30.06.2022 पर्यंत) गेल्या तीन वर्षांत आणि चालू वर्षात विविध राज्ये/राज्य संस्थांना 16,854.84 लाख रुपये देण्यात आले असून महाराष्ट्राला  245.64 लाख रूपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे.

वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

S. No.

State/UTs

Financial assistance provided

(Rs. in lakh)

1

Andhra Pradesh

2,216.73

2

Arunachal Pradesh

191.10

3

Assam

1,694.77

4

Bihar

491.44

5

Chhattisgarh

388.20

6

Gujarat

165.21

7

Haryana

6.60

8

Himachal Pradesh

72.98

9

Jammu & Kashmir

361.11

10

Jharkhand

475.27

11

Karnataka

682.25

12

Kerala

493.25

13

Ladakh

6.65

14

Madhya Pradesh

321.75

15

Maharashtra

245.64

16

Manipur

3,596.78

17

Mizoram

809.50

18

Nagaland

404.53

19

Orissa

1,009.83

20

Punjab

24.14

21

Rajasthan

59.10

22

Sikkim

126.58

23

Tamil Nadu

753.74

24

Telangana

570.19

25

Tripura

469.60

26

Uttar Pradesh

764.77

27

Uttarakhand

64.12

28

West Bengal

389.04

 

Total

16,854.84

 

* * *

S.Kane/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1847939) अभ्यागत कक्ष : 125