भूविज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी अंटार्क्टिकामध्ये वैज्ञानिक संशोधन आणि लॉजिस्टिक प्रयत्नांसाठी मजबूत जागतिक सहकार्य उभारण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून पुढील अनेक पिढ्यांपर्यत या प्रदेशातील मूळ स्थिती टिकून राहावी
अंटार्क्टिक संशोधन संबंधी 10 व्या वैज्ञानिक समुदाय खुल्या विज्ञान परिषदेला (SCAR) दूरदृश्य प्रणालीद्वारे केले संबोधित , मानवाने लादलेल्या बदलांमुळे जगाला अभूतपूर्व हवामान बदलाचा सामना करावा लागत असल्याचे केले अधोरेखित
वैज्ञानिक समुदायाने सामंजस्याने बोलण्याची आणि अंटार्क्टिक वारसा आणि वैज्ञानिक वृत्तीच्या समान उद्दिष्टांसाठी कार्य करणे ही काळाची गरज-जितेंद्र सिंह
Posted On:
01 AUG 2022 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2022
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी,निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज अंटार्क्टिकामध्ये वैज्ञानिक संशोधन आणि लॉजिस्टिक प्रयत्नांसाठी मजबूत जागतिक सहकार्य उभारण्याचे आवाहन केले जेणेकरून पुढील अनेक पिढ्यांपर्यंत हा खंड जो सर्वात मोठा "रेफ्रिजरेटर" आहे जो त्याच्या मूळ स्थितीत टिकून राहील.
अंटार्क्टिक संशोधन संबंधी 10 व्या वैज्ञानिक समुदाय खुल्या विज्ञान परिषदेला (SCAR) दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, हे गंभीर आहे कारण जगाला मानवाने लादलेल्या बदलांच्या टप्प्यात अभूतपूर्व हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे . ते म्हणाले, अंटार्क्टिकामधील हा बदल हवामानाच्या नमुन्यांमध्ये दिसून येईलच आणि त्याद्वारे केवळ जगाच्या हवामानावरच नव्हे तर अर्थव्यवस्था आणि आरोग्यावरही त्याचा परिणाम होईल. वैज्ञानिक समुदायाने सामंजस्याने बोलण्याची आणि अंटार्क्टिक वारसा आणि वैज्ञानिक वृत्तीच्या समान उद्दिष्टांसाठी कार्य करणे ही काळाची गरज आहे असे जितेंद्र सिंह म्हणाले.
Z8PS.jpg)
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, भारत अंटार्क्टिक करार प्रणाली, पर्यावरण संरक्षण समिती (CEP) आणि अंटार्क्टिक सागरी जीवन संसाधने संवर्धन करार (CCAMLR) आणि एससीएआर SCAR चा सक्रिय सदस्य असल्याने अंटार्क्टिक खंडासह लगतच्या महासागराचे संवर्धन आणि जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. अंटार्क्टिका पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि पूर्व अंटार्क्टिका आणि वेडेल समुद्राला सागरी संरक्षित क्षेत्र (एमपीए) म्हणून घोषित करण्याच्या युरोपियन महासंघाच्या प्रस्तावाला सह-प्रायोजकत्व देण्यासाठी भारताने पाठिंबा दर्शवला आहे.
डॉ जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले की 10 व्या एससीएआर खुल्या विज्ञान परिषदेचे आयोजन हा भारतासाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे कारण ते भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात होत आहे, जे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरे केले जात आहे. तुम्हा सर्वांचे भारतात प्रत्यक्षात स्वागत करण्याची एक उत्तम संधी आम्हाला गमवावी लागली, परंतु वैज्ञानिक इतिहास तसेच सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत असलेल्या देशाशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी ही परिषद तुम्हाला लवकरच भारतात घेऊन येईल, अशी आशा जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847181)
Visitor Counter : 156