सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा उद्या "तिरंगा उत्सव" मध्ये सहभागी होणार

“हर घर तिरंगा” गाणे आणि व्हिडिओ प्रकाशित करणार

भारताच्या राष्ट्रध्वजाचे रचनाकार स्वातंत्र्यसैनिक पिंगली व्यंकय्या यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित केले जाणार

Posted On: 01 AUG 2022 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑगस्‍ट 2022

 

भारताच्या राष्ट्रध्वजाचे रचनाकार स्वातंत्र्यसैनिक पिंगली व्यंकय्या यांनी  देशासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे उद्या “तिरंगा उत्सव” आयोजित करण्यात आला असून सांस्कृतिक आणि सांगितीक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

या कार्यक्रमाला गृह आणि सहकारमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश  विकास मंत्री  जी. किशन रेड्डी  दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव; संसदीय कामकाज  आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल; परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांसारख्या इतर प्रमुख व्यक्ती आणि मान्यवर या देशभक्तीपर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पिंगली व्यंकय्या यांनी देशासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा सत्कार या कार्यक्रमात केला जाईल. या भव्य  तिरंगा उत्सवामध्ये “हर घर तिरंगा” गीत आणि व्हिडिओ देखील जारी केला जाणार आहे. संगीतमय रजनीमध्ये कैलाश खेर आणि कैलासा, हर्षदीप कौर आणि डॉ. रागिणी मखर यांच्या सारखे दिग्गज लाईव्ह परफॉर्मन्स सादर करतील.

स्वातंत्र्यसैनिक आणि भारताच्या राष्ट्रध्वजाचे रचनाकार  पिंगली व्यंकय्या हे गांधीवादी तत्त्वांचे अनुयायी होते आणि महात्मा गांधींच्या विनंतीवरून त्यांनी मध्यभागी चक्रासह केशरी , पांढरा आणि हिरवा रंग असलेला भारतीय राष्ट्रध्वज तयार केला.

भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी सांस्कृतिक रजनी एक ऐतिहासिक दिवस ठरेल आणि देशाच्या सर्वात महत्वाच्या रत्नांपैकी एक - पिंगली व्यंकय्या यांना एक मानवंदना असेल.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1847171) Visitor Counter : 54