उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी गुणवत्तापूर्ण  शिक्षणाच्या न्याय्य संधी उपलब्ध व्हाव्या -  उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 31 JUL 2022 9:54PM by PIB Mumbai

 

प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या न्याय्य संधीसाठी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी आवाहन केले आहे. अभ्यासक्रमाची पुस्तके न मिळाल्यामुळे  किंवा शिक्षणाचे  शुल्क न भरल्यामुळे कोणताही विद्यार्थी  मागे राहू नये यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.  शिक्षणाच्या समान संधीं प्राप्तीमधले सर्व अडथळे दूर केले जातील हे आपण सुनिश्चित करायला हवे असे ते म्हणाले.

शिक्षण हे परिवर्तनाचे सर्वात सामर्थ्यशाली  साधन असून  ते  देशाच्या विकासाच्या गतीला चालना देऊ शकते, असे नायडू यांनी  राजस्थान युवा संघटनेच्या  हिरक  महोत्सवी समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.

 

लोकसंख्येचा फायदा आणि उच्च प्रतिभावंत तरुणाईमुळे भारतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये जागतिक नेतृत्व करण्याची  प्रचंड क्षमता आहे, असे नायडू यांनी सांगितले.

आयुष्यात यश, कीर्ती आणि संपत्ती मिळवलेल्या  प्रत्येक भारतीयाचे त्याची समाज आणि देशाला परतफेड करणे हे कर्तव्य आहे, असे नायडू यांनी भारतीय संस्कृतीच्या  मूल्यांचे स्मरण करून सांगितले. राष्ट्र उभारणीसाठी काम करणे ही एकट्या सरकारची जबाबदारी नाही; सर्व नागरिकांनी सक्रियपणे पुढे येऊन देशवासीयांच्या कल्याणासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1846823) Visitor Counter : 172