शिक्षण मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित उपक्रम सुरू केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे नवीन शिक्षण धोरण स्वावलंबी, सशक्त, समृद्ध आणि सुरक्षित भारताचा पाया आहे आणि हे शिक्षण धोरण प्रत्येक बालकापर्यंत पोहोचवण्याचे आणि त्यांचे भविष्य घडविण्याचे साधन आहे.

देशाला संशोधन आणि विकासाचे केंद्र  बनवायचे असेल तर विचारप्रक्रिया चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे

Posted On: 29 JUL 2022 10:30PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित अनेक नवीन उपक्रमांचा शुभारंभ केला. सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये डिजिटल शिक्षण, नव उपक्रम, शिक्षण आणि कौशल्य विकास, शिक्षक प्रशिक्षण आणि मूल्यमापन यासारख्या क्षेत्रांसह शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या समग्र विस्ताराचा समावेश आहे. शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार, अन्नपूर्णा देवी आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यावेळी उपस्थित होते.

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/WhatsAppImage2022-07-29at10.32.17PM(1)Z5XP.jpeg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/WhatsAppImage2022-07-29at10.32.20PM(1)9H5T.jpeg

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाकडे लोक वेगवेगळ्या प्रकारे पाहतात, पण त्यांचा असा विश्वास आहे की देश हा देशातील नागरिकांनी उभारला जातो आणि हे 2020 चे राष्ट्रीय शिक्षण धोरण हे प्रतिभावान नागरिक घडवण्याच्या मूळ कल्पनेतून तयार करण्यात आले आहे, असे यावेळी अमित शहा म्हणाले.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. राष्ट्रीय शिक्षण धोरण स्वावलंबी, सशक्त, समृद्ध आणि सुरक्षित भारताचा पाया घालेल. हे शिक्षण धोरण प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांचे भविष्य घडविण्याचे माध्यम आहे, असेही अमित शहा यांनी सांगितले. स्वामी विवेकानंदांना उद्धृत करून त्यांनी सांगितले की संघर्षाला सामोरे जाण्यासाठी शिक्षण माणसाला सक्षम बनवते, त्याचे चारित्र्य घडवते, त्याला परोपकारी बनवते आणि त्याच्यात धैर्य निर्माण करते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 हे भारताच्या सांस्कृतिक मुळाशी जोडलेले आहे आणि प्रत्येकाच्या सूचनांचा आदर करून हे शिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 मध्ये भारताची संस्कृती आणि ज्ञान परंपरा समाविष्ट करण्यासोबतच जगभरातील नवनवीन शोध, विचार आणि आधुनिकता यांचा समावेश करण्याचा मार्गही खुला झाला असून त्यात संकुचित विचारांना स्थान नाही, असेही ते पुढे म्हणाले.

कौशल्य विकासाबाबतही त्यांनी मते मांडली. या शिक्षण धोरणात 2025 पर्यंत किमान 50% विद्यार्थ्यांना शालेय व उच्च शिक्षण व्यवस्थेतील व्यावसायिक शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, जे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, असे शहा यांनी सांगितले.

ज्ञान ही नेहमीच भारताची राजधानी राहिली आहे, असे धर्मेंद्र प्रधान यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. जग जेव्हा कोविड-19 महामारीच्या संकटाशी झुंजत होते, तेव्हा भारताने संकटाचे संधीत रूपांतर केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भविष्यकालीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणले गेले, असे प्रधान यांनी पुढे नमूद केले.

आज सुरू करण्यात आलेले काही उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत-

तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकासाठी भारतीय ज्ञान प्रणाली- शिक्षण मंत्रालयाचा नवोन्मेष विभाग ( IKS-MIC) कार्यक्रमाची स्थापना

हा अनोखा उपक्रम भारताच्या पारंपरिक ज्ञान प्रणालींमधून प्रेरित आणि विकसित उत्पादनांच्या विकासाला चालना देईल.

 

शाळांमध्ये 75 भारतीय खेळ सादर करा.

आपल्या मुलांना भारतीय खेळांची ओळख करून देणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.

 

स्थानिक कलांना प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी 750 शाळांमध्ये कलाशाळा उपक्रम सुरू करणे

भारतातील विविध कला प्रकारांबद्दल मुलांना शिक्षित करणे आणि त्यांना भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा शोधण्यात आणि त्यांचे कौतुक करण्यात मदत करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

  • शिक्षण मंत्रालयाचा भारतीय ज्ञान प्रणाली ( IKS) विभाग, कलाशाला निवासी कलाकार कार्यक्रमांद्वारे शिक्षणसंस्थांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020  च्या सूचना लागू करण्याचा प्रयत्न करतो.
  • इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ (IGNOU) सह भागीदारी विद्यार्थ्यांना वरच्या दिशेने गतिशीलता प्रदान करण्यासाठी आणि त्यांना उच्च शिक्षण आणि उपजीविकेच्या अधिक संधी मिळविण्यात मदत करण्यासाठी-.
  • भारत सरकारने कौशल्य विकासामध्ये नवीन पुढाकार घेतला आहे जसे की प्रधान मंत्री कौशल विकास योजना (PMKVY) अंतर्गत "कौशल्य हब" उपक्रम ज्याचा उद्देश शिक्षण आणि कौशल्य परिसंस्थेसह सामायिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, स्थानिक आर्थिक आणि कौशल्य विकासाच्या गरजा पूर्ण करणे आहे.
  • 100+ राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) संरेखित भविष्यातील कौशल्य पात्रता 6 प्रमुख क्षेत्रांतर्गत विकसित केली जाईल:

o  उद्योगांमध्ये ऑटोमेशन

o  पायाभूत सुविधा कनेक्टिव्हिटी (ईव्ही आणि ड्रोन)

o  इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि खूप मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण (VLSI)

o  5G आणि सायबर सुरक्षेसह तंत्रज्ञान पायाभूत सुविधा

o  डिजिटल उदयोन्मुख तंत्रज्ञान

o  देशी संशोधन आणि विकास

 

व्हर्च्युअल लॅबची स्थापना

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये, महत्त्वपूर्ण गंभीर विचार कौशल्यांना चालना देण्यासाठी, सर्जनशीलतेला जागा देण्यासाठी, विज्ञान आणि गणितातील 750 आभासी प्रयोगशाळा आणि सिम्युलेटेड शिक्षण वातावरणासाठी 75 कौशल्य ई-लॅबची स्थापना 2022-23 मध्ये केली जाईल.

 

राष्ट्रीय डिजिटल शिक्षण आर्किटेक्चर( NDEAR)सह विद्या समीक्षा केंद्र

राष्ट्रीय डिजिटल शिक्षण आर्किटेक्चर अनुपासलित विद्या समीक्षा केंद्र हा एक संस्थात्मक मार्ग आहे जो त्यांच्या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाच्या भागधारकांद्वारे कृती करण्यासाठी डेटा-आधारित निर्णय घेण्यास वाढविण्यासाठी एकात्मिक आणि सामायिक 'पाहणे' सक्षम करतो.

विद्या अमृत पोर्टल

देशाच्या विविध भागांमध्ये शालेय शिक्षणात होत असलेल्या सूक्ष्म-सुधारणा वाढवण्यासाठी, एक डिजिटल प्रकल्प सक्षम केला जात आहे.

 

नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स आणि टीचर्स होलिस्टिक अॅडव्हान्समेंट (NISHTHA): सुरूवातीचे बालपण आणि काळजीसंदर्भातील शिक्षण (ECCE)

उद्दिष्ट: अंगणवाड्यांमध्ये उच्च दर्जाचे ईसीसीई शिक्षकांचे प्रारंभिक संवर्ग तयार करणे.

 

शालेय नवोपक्रम धोरण

नॅशनल इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्युअरशिप प्रमोशन पॉलिसी शालेय शिक्षण प्रणालींना विविध उपायांबद्दल मार्गदर्शन करते जे शिक्षण वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वीकारले जाऊ शकते जेथे सर्जनशीलता, कल्पना, नवकल्पना, समस्या सोडवणे आणि विद्यार्थ्यांची उद्योजकता कौशल्ये जोपासली जातात, त्यांचे वय काहीही असो.

 

राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषेसाठी ( NCF) साठी सार्वजनिक सल्ला सर्वेक्षण

उद्दिष्ट: राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषे च्या विकासासाठी निविष्ठा आणि सूचना मिळविण्यासाठी 1 कोटी लक्ष्यित प्रतिसादकर्ते/नागरिकांसह 23 भाषांमध्ये सार्वजनिक सल्लामसलत सर्वेक्षण आयोजित करणे.

***

S.Patil/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1846468) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi