गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या चंदीगडमध्ये 'अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षितता' या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेला करणार संबोधित


पहिलीच राष्ट्रीय परिषद, ज्यात देशाचे गृहमंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि औषध अंमलबजावणी विभाग एका मंचावर उपस्थित राहणार

Posted On: 29 JUL 2022 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2022

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह  उद्या चंदीगड येथे 'अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षितता' या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत. या परिषदेला हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबचे मुख्यमंत्री, चंदिगडचे प्रशासकीय अधिकारी, सीमा सुरक्षा दल, राष्ट्रीय तपास संस्था, अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे अधिकारी तसेच संबंधित राज्यांच्या नक्षल विरोधी कृती दलाचे प्रमुख आणि अमली पदार्थ समन्वय केंद्राचे सदस्य उपस्थित राहतील. 

अशा प्रकारची ही पहिलीच राष्ट्रीय परिषद आहे ज्यामध्ये देशाचे गृहमंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि औषध अंमलबजावणी विभाग एका व्यासपीठावर उपस्थित असतील.

S. No

Location

Quantity of drug to be disposed in Kgs

1

Delhi

 

19,320

2

Chennai

 

1,309.401

3

Guwahati

 

6,761.63

4

Kolkata

 

30,77.753

 

Total quantity

30,468.784  Kgs

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या आहवानाला अनुसरून, गृहमंत्री अमित शाह  यांच्या नेतृत्वात, अमली पदार्थ नियंत्रण विभागाने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात 75 हजार किलो अमली पदार्थ नष्ट करण्याचा संकल्प केला होता. अमली पदार्थ नियंत्रण विभागाने 1 जून 2022 पासून सुरू केलेल्या या अभियानांतर्गत, 29 जुलै पर्यंत देशातल्या 11 राज्यांमध्ये 51217.8402 किलोग्राम अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांच्या उपस्थितीत आणखी 30468.784 किलो ग्राम अमली पदार्थ नष्ट करण्यात येणार आहेत. यानंतर एकूण नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थांचे वजन 81686.6242 किलोग्राम होते.

 

* * *

R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1846376) Visitor Counter : 177