वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या पाच देशांमध्ये सिंगापूर (27.01%) अमेरिका (17.94%), मॉरिशस (15.98%) नेदरलँड (7.86%) आणि स्वित्झर्लंड (7.31%) या देशांचा समावेश


आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये उत्पादन क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीत मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 76% ने वाढ; (21.34 अब्ज अमेरिकी डॉलर) गेल्या वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष 2020-21
मध्ये ही वाढ 12.09 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी होती

उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसाठी भारत आता वेगाने उदयास येणारी पसंतीची अर्थव्यवस्था ठरत आहे.

थेट परकीय गुंतवणुकीत कर्नाटक (37.55%) आणि महाराष्ट्र (26.26%) ही दोन राज्य आघाडीवर

Posted On: 28 JUL 2022 2:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2022

 

आर्थिक वर्ष 2021- 22 मध्ये भारतात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणुकीचे स्रोत म्हणून सिंगापूर (27.1%) आणि अमेरिका (17.94%) या देशांचा क्रमांक असून यानंतर मॉरिशस (15.98%),नेदरलँड (7.86%) आणि स्विझर्लंड (7.31%) या देशांचा क्रमांक लागतो. हे लक्षात घ्यायला हवं की, UNCTAD जागतिक गुंतवूकविषयक अहवाल 2022 नुसार,जागतिक गुंतवणुकीचा कल पाहता  असे दिसते की, 2021 या वर्षात जगातल्या 20 सर्वाधिक गुंतवणूक होणाऱ्या अर्थव्यवस्थाच्या यादीत, भारताचे स्थान एका अंकाने वर जाऊन सातव्या स्थानापर्यंत पोहोचले आहे.

उत्पादन क्षेत्रात थेट गुंतवणूक करण्यासाठी, भारत नव्यानं उदयास येणारी पसंतीची अर्थव्यवस्था ठरत असून उत्पादन क्षेत्रात मागच्या वर्षीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये परदेशी गुंतवणुकीत 76%, वाढ झाली आहे (USD 21.34 billion) गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2020-21 मध्ये ही वाढ 12 पूर्णांक 09 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी होती (USD 12.09 billion).

विमा, संरक्षण, टेलिकॉम, आर्थिक सेवा, औषधनिर्माण क्षेत्र, किरकोळ व्यापार, ई-कॉमर्स,बांधकाम आणि विकास, नागरी विमानसेवा आणि उत्पादन क्षेत्र इत्यादी क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी केंद्र सरकारनं विविध सुधारणा धोरण राबविले आहे. सध्या महामारीचा काळ असला तरी भारतात आर्थिक वर्ष 21- 22 मध्ये सर्वाधिक वार्षिक थेट परकीय गुंतवणूक झाली असून ती 84 हजार 835 दशलक्ष अमेरिकन डॉलर (USD 84,835 million) एवढी आहे मागच्या आर्थिक वर्षी ही गुंतवणूक 2 पूर्णांक 87 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी होती (USD 2.87 billion). याआधी आर्थिक वर्ष 2020-21 मध्येही मागच्या वर्षीच्या तुलनेत परदेशी गुंतवणुकीत USD 81,973 million ने वाढ होऊन ती आर्थिक वर्ष 2019 20 मध्ये 74,391दशलक्ष इतकी होती.

आर्थिक वर्ष 2021 -22 मध्ये सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक होणारी पाच क्षेत्र आहेत, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर( 24.60%) सेवा क्षेत्र यात बँकिंग, विमा, बिगर आर्थिक उद्योग व्यवहार, आऊटसोर्सिंग, संशोधन आणि विकास, कुरियर, तंत्रज्ञान चाचणी आणि विश्लेषण  आणि वाहन उद्योग (11.89%), व्यापार (7.72%) आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात (5.52%)

आर्थिक वर्ष 2021 मध्ये सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक झालेली पाच राज्य आहेत ,कर्नाटक (37.55%), महाराष्ट्र (26.26%),दिल्ली(13.93%),तामिळनाडू (5.10%) आणि हरियाणा ( 4.76%)

आर्थिक वर्ष 2021- 22 मध्ये थेट परदेशी गुंतवणुकीसाठी 101 देशातल्या गुंतवणुकीचा विचार करण्यात आला तर आर्थिक वर्ष 2020 -21 साठी 97 देशांमधला गुंतवणुकीचा वेग लक्षात घेण्यात आला.भारतात आता संवेदनशील नसलेल्या क्षेत्रात शंभर टक्के थेट गुंतवणुकीला परवानगी मिळाली असून यासाठी गृहमंत्रालयाकडून सुरक्षाविषयक मंजूरीची आवश्यकता नाही. याआधी पाकिस्तान आणि बांगलादेश या देशाकडून होणारी गुंतवणूक, याशिवाय काही संवेदनशील क्षेत्रे , जसे संरक्षण, माध्यमे, टेलिसंवाद, उपग्रह, खाजगी सुरक्षा व्यवस्था, नागरी विमान वाहतूक, आणि खान उद्योग यात थेट परदेशी गुंतवणुकीसाठी मात्र सरकारी परवानग्या किंवा गृह व्यवहार विभागाकडून सुरक्षा परवाना मिळणे आवश्यक असेल.

 

* * *

R.Aghor/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1845794) Visitor Counter : 2841


Read this release in: Malayalam , English , Urdu , Tamil