आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 203 कोटी 21 लाख पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील 3 कोटी 87 लाखांहून अधिक मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या पाहिली मात्रा देण्यात आली

भारतातील सध्याची कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,46,323

गेल्या 24 तासात देशात 20,557 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील कोविड मुक्ती दर सध्या 98.47%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.71% आहे

Posted On: 28 JUL 2022 10:14AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 203.21 कोटींचा (2,03,21,82,347) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,68,70,726 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 87 लाखांहून अधिक (3,87,53,472) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10411450

2nd Dose

10088505

Precaution Dose

6243115

FLWs

1st Dose

18430074

2nd Dose

17668032

Precaution Dose

12017373

Age Group 12-14 years

1st Dose

38753472

2nd Dose

27469645

Age Group 15-18 years

1st Dose

61094113

2nd Dose

50800166

Age Group 18-44 years

1st Dose

559393332

2nd Dose

508221773

Precaution Dose

18800141

Age Group 45-59 years

1st Dose

203664056

2nd Dose

195151372

Precaution Dose

13052649

Over 60 years

1st Dose

127425951

2nd Dose

121948896

Precaution Dose

31548232

Precaution Dose

8,16,61,510

Total

2,03,21,82,347

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,46,323 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.33% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.47% झाला आहे. गेल्या 24 तासात 19,216 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,32,86,787 झाली आहे. 

गेल्या 24 तासात, देशात नव्या 20,557 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 3,96,783  चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 87 कोटी 40 लाखांहून अधिक (87,40,08,037)  चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.71% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 5.18% इतका नोंदला गेला आहे.

***

RA/BS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1845744) Visitor Counter : 182