PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 25 JUL 2022 6:55PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 202.17 cr Total Vaccine doses (92.99 cr Second Dose and 7.30 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 16,82,390 doses administered in last 24 hours
  • India's Active caseload currently stands at1,50,877
  • Active cases stand at 0.34%
  • Recovery Rate currently at 98.46%
  • 18,148recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,32,28,670
  • 16,866new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (7.03%)
  • Weekly Positivity Rate (4.49%)
  • 87.27cr Total Tests conducted so far; 2,39,751tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 25 जुलै 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 202.17 कोटींचा (2,02,17,66,615) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,66,70,946 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. 16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 85 लाखांहून अधिक (3,85,28,615) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,50,877 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.34% आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.46% झाला आहे. गेल्या 24 तासांत 18,148 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,32,28,670 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 16,866  कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण  2,39,751चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 87कोटी 27  लाखांहून अधिक (87,27,59,815) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.49% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 7.03%. इतका नोंदला गेला आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

* * *

S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1844741) Visitor Counter : 213