आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 202 कोटी17 लाख पेक्षाअधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील 3 कोटी, 85 लाखांहून अधिक मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या पाहिली मात्रा देण्यात आली.

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 1,50,877

गेल्या 24 तासांत देशात 16,866 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.46%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.49 % आहे

Posted On: 25 JUL 2022 9:35AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 202.17 कोटींचा (2,02,17,66,615) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,66,70,946 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 85 लाखांहून अधिक (3,85,28,615) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10411128

2nd Dose

10086208

Precaution Dose

6178264

FLWs

1st Dose

18429387

2nd Dose

17663950

Precaution Dose

11853615

Age Group 12-14 years

1st Dose

38528615

2nd Dose

27099459

Age Group 15-18 years

1st Dose

61018972

2nd Dose

50618242

Age Group 18-44 years

1st Dose

559263213

2nd Dose

507628059

Precaution Dose

14374330

Age Group 45-59 years

1st Dose

203640708

2nd Dose

195010960

Precaution Dose

10232272

Over 60 years

1st Dose

127411014

2nd Dose

121860416

Precaution Dose

30457803

Precaution Dose

7,30,96,284

Total

2,02,17,66,615

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,50,877 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.34% आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002C9IY.jpg

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.46% झाला आहे. गेल्या 24 तासांत 18,148 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,32,28,670 झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003MJCY.jpg

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 16,866  कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004ZGHD.jpg

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण  2,39,751चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 87कोटी 27  लाखांहून अधिक (87,27,59,815) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.49% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 7.03%. इतका नोंदला गेला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005YVRT.jpg

***

Jaydevi PS/VPY/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1844537) Visitor Counter : 218