गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी त्यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज, गांधीनगरमध्ये गुजरात पोलिसांच्या 'त्रिनेत्र' या राज्यस्तरीय कमांड आणि कंट्रोल सेंटरचे आणि VISWAS प्रकल्पांतर्गत इतर आधुनिक तांत्रिक सेवांचे केले उद्घाटन

Posted On: 23 JUL 2022 10:12PM by PIB Mumbai

 

गुजरात पोलीसांना आधुनिक आणि टेक्नोसॅव्ही बनवण्यासाठी आणि सार्वजनिक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी, गुजरात सरकारने अनेक महत्त्वाची कामे समर्पित केली आहेत. मुख्यमंत्री या नात्याने नरेंद्र मोदी यांनी नेहमीच गुजरातमधील कायदा, सुव्यवस्था आणि पोलीस दलांचे आधुनिकीकरण तसेच सक्षमीकरण करण्यास प्राधान्य दिले. याच कारणामुळे गुजरात पोलिसांनी अनेक वर्षांपासून देशात आघाडीवर राहण्याची परंपरा निर्माण केली आहे. मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा भविष्यातही कायम राहील. गुजरात पोलीस आधुनिक, संवेदनशील आणि टेक्नोसॅव्ही झाले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची समर्थन प्रणाली मजबूत केली आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी त्यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज, गांधीनगरमध्ये गुजरात पोलिसांच्या 'त्रिनेत्र' या राज्यस्तरीय कमांड आणि कंट्रोल सेंटर तसेच VISWAS प्रकल्पांतर्गत इतर आधुनिक तांत्रिक सेवांचे उद्घाटन केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले की, आज गुजरात सरकारकडून गुजरात पोलिसांना आधुनिक आणि टेक्नोसॅव्ही बनवण्यासाठी आणि सार्वजनिक सुविधा वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाची कामे समर्पित करण्यात आली आहेत. यासाठी मी गुजरातचे मुख्यमंत्री आणि गुजरातचे गृहमंत्री यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणाला नेहमीच प्राधान्य दिले. यामुळेच गुजरात पोलिसांची गेल्या अनेक वर्षांपासून देशात आघाडीवर राहण्याची परंपरा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा कायम राहील, असा मला विश्वास आहे.

नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत द्रोपदी मुर्मु प्रचंड बहुमताने निवडून आल्या. त्यांची देशाच्या सर्वोच्चपदी झालेली निवड आणि त्यांचे श्रीमती द्रोपदी मुर्मु या भूमिकेतून राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु या पदापर्यंत झालेले स्थित्यंतर ही गेल्या 75 वर्षांतील देशाच्या लोकशाही इतिहासातील ऐतिहासिक घटना आहे, ही आपल्या लोकशाहीतील एक मोठी घटना आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.  राष्ट्रपतिपदासारख्या महत्त्वाच्या पदांसाठी उमेदवार निवडताना आमचा पक्ष नेहमीच वेगळा प्रयत्न करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली आहे, असे शाह म्हणाले. प्रकल्पांवरचा आत्मविश्वास आणि विश्वास वाढावा यासाठी विविध उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

गुजरात पोलिसांच्या सुरक्षा सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी, विस्तारित करण्यासाठी आणि आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांनी 10,000 बॉडी कॅमेरे, व्हिडिओ फीड मॅनेजमेंट सिस्टम, वर्क स्टेशन, डॉकिंग स्टेशन आणि सर्व्हर पोलिस दलाला देणगीदाखल दिले. अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट (मानवी तस्करीविरोधी विभागा)ची 80 वाहनेही आज गुजरात पोलिसांना समर्पित करण्यात आली. कमांड आणि कंट्रोल रूम  केवळ 7 हजार कॅमेऱ्यांपुरती मर्यादित न राहता गुजरात राज्यातील रेल्वे स्थानके, बसस्थानक, बंदरे, विमानतळ आणि निवासी वसाहतींमधील प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांनाही या यंत्रणेत समाविष्ट करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गुजरात हे पहिले राज्य आहे जिथे ई-कॉप सुरू करण्यात आले. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे संगणकीकरण, हवालदारांची भरती, प्रशिक्षण यंत्रणा आणि त्रिनेत्रचे प्रशासन ई-कॉप सॉफ्टवेअरद्वारे करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

***

R.Aghor/S.Mukhedkar/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1844296) Visitor Counter : 245


Read this release in: English , Urdu , Manipuri , Gujarati