महिला आणि बालविकास मंत्रालय
नारी शक्ती पुरस्कार-2022 साठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मागवल्या प्रवेशिका/ नामांकनं
महिला सक्षमीकरणासाठी, विशेषत: असुरक्षित आणि उपेक्षित महिलांकरिता केलेल्या सेवेची ओळख म्हणून व्यक्तिगत पुरस्कारांचे होणार वितरण
ऑनलाइन प्रवेशिका/नामांकनं सादरीकरणाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022
Posted On:
22 JUL 2022 8:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2022
भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने नारी शक्ती पुरस्कार-2022 साठी प्रवेशिका/नामांकनं मागवली आहेत. नारी शक्ती पुरस्कार, 2022 साठीच्या प्रवेशिका /नामांकनं केवळ नियुक्त केलेल्या www.awards.gov.in या संकेतस्थळाद्वारेच स्वीकारण्यात येतील.
31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्राप्त झालेल्या प्रवेशिका/नामांकनं वर्ष 2022 च्या नारी शक्ती पुरस्कारासाठी विचारात घेतली जातील.
नारी शक्ती पुरस्कार 2022 हा महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त म्हणजेच 8 मार्च 2023 रोजी महिला सक्षमीकरणासाठी विशेषत: असुरक्षित आणि उपेक्षित महिलांकरिता केलेल्या सेवेचा गौरव म्हणून प्रदान केला जाईल.
पात्रता निकष आणि इतर तपशील, नारी शक्ती पुरस्कारासाठी मार्गदर्शक तत्त्वे महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या https://wcd.nic.in/acts/guidelines-nari-shakti-puraskar-2022-onwards तसेच प्रवेशिका/नामांकन पोर्टल www.awards.gov.in. यावर उपलब्ध आहेत.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844044)