आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 200.91 कोटी मात्रांचा टप्पा पार केला


12 ते 14 वयोगटातील किशोरांना 3.82 कोटीहून (3,82,20,319) अधिक पहिली मात्रा

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 1,48,881

गेल्या 24 तासांत, 21,566 नव्या रूग्णांची नोंद

सध्याच्या घडीला कोविडमुक्तीचा दर 98.46 टक्के

गेल्या 24 तासांत, 18,294 रूग्ण कोरोनामुक्त तर एकूण कोरोनामुक्त रूग्णसंख्या 4,31,50,434

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.50 टक्के

Posted On: 21 JUL 2022 9:30AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजता आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसारदेशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 200.91 कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,64,98,391 सत्रांच्या माध्यमातून हे साध्य करण्यात आले आहे.

 12 ते 14 वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आली. आतापर्यंत  3.82 हून (3,82,20,319) अधिक किशोरांना पहिल्या डोसच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीची लसीची मात्रा देण्याची मोहीम 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाली.

आज सकाळी आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकत्रित आकडेवारीचा तपशील असा आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10410641

2nd Dose

10082207

Precaution Dose

6090515

FLWs

1st Dose

18428331

2nd Dose

17656581

Precaution Dose

11633199

Age Group 12-14 years

1st Dose

38220319

2nd Dose

26602139

Age Group 15-18 years

1st Dose

60924883

2nd Dose

50337271

Age Group 18-44 years

1st Dose

559039608

2nd Dose

506605213

Precaution Dose

9569637

Age Group 45-59 years

1st Dose

203594377

2nd Dose

194735575

Precaution Dose

7039257

Over 60 years

1st Dose

127379127

2nd Dose

121681902

Precaution Dose

29161187

Precaution Dose

6,34,93,795

Total

2,00,91,91,969

भारतातील एकूण उपचाराधीन रूग्णसंख्या सध्याच्या घडीला 1,48,881 आहे. उपचाराधीन रूग्णसंख्येची टक्केवारी देशाच्या एकूण पॉझिटिव्ह रूग्णांच्या तुलनेत 0.34 टक्के इतकी आहे.

परिणामीभारताचा कोरोनामुक्तीचा दर सध्याच्या घडीला 98.46 टक्के  इतका आहे. गेल्या 24  तासांत, 18,294 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची (कोरोना महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,31,50,434 इतकी आहे.

गेल्या 24  तासांत, 21,566 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24  तासांतएकूण 5,07,360 एकूण चाचण्या पार पाडल्या आहेत. आतापर्यंतभारताने एकूण 87.11 (87,11,60,846) कोटी हून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 4.50 टक्के इतका असून दैनंदिन सध्याच्या घडीला 4.25 टक्के इतका आहे.

***

S.Thakur/U.Kulkarni/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1843361) Visitor Counter : 210