आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 200.61 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.81 कोटींपेक्षा जास्त किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,45,654

गेल्या 24 तासात 20,557 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.47%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.64%

Posted On: 20 JUL 2022 10:38AM by PIB Mumbai

आज सकाळी वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसारभारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 200.61 (2,00,61,24,684) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,64,58,875 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.81 (3,81,47,897) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे: 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10410539

2nd Dose

10081182

Precaution Dose

6066760

FLWs

1st Dose

18428070

2nd Dose

17654983

Precaution Dose

11577551

Age Group 12-14 years

1st Dose

38147897

2nd Dose

26478978

Age Group 15-18 years

1st Dose

60897295

2nd Dose

50269733

Age Group 18-44 years

1st Dose

558989673

2nd Dose

506377727

Precaution Dose

8434037

Age Group 45-59 years

1st Dose

203585682

2nd Dose

194681701

Precaution Dose

6195274

Over 60 years

1st Dose

127373114

2nd Dose

121647005

Precaution Dose

28827483

Precaution Dose

6,11,01,105

Total

2,00,61,24,684

 

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 1,45,654 इतकी आहेती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.33% इतकी आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002DFI1.jpg

परिणामीभारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.47% झाला आहे. 

गेल्या 24 तासात 18,517 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,31,32,140 झाली आहे. 

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00389I5.jpg 

गेल्या 24 तासात 20,557 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004ZCK3.jpg

गेल्या 24 तासात एकूण 4,98,034 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 87.06 (87,06,53,486) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.64% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.13% आहे. 

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005VM47.jpg

***

SonalT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1842969) Visitor Counter : 138