राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चौथ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्मृती व्याख्यानमालेत राष्ट्रपतींनी केले संबोधित

Posted On: 19 JUL 2022 10:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2022

 

राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांनी आज (19 जुलै, 2022) रोजी नवी दिल्ली येथे चौथ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्मृती व्याख्यानमालेत संबोधित केले. डॉ कलाम जितका  भर विज्ञानावर देत असत तितकेच  महत्व ते अध्यात्माला देत असत. सामान्य लोकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे हे त्यांच्या अभियानांपैकी एक कार्य होते.एका संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे अभियान  पुढे नेले, असे राष्ट्रपतींनी यावेळी बोलताना सांगितले. ते नेहमी सर्व धर्मातील संत आणि अध्यात्मिक क्षेत्रातील  द्रष्ट्या लोकांना  भेटायचे आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी  'बिल्डिंग अ न्यू इंडिया' नावाच्या  एका छोट्या पुस्तकात   'संत आणि द्रष्ट्यांकडून शिकवण '.या आशयाचे एक प्रकरण आहे. त्या प्रकरणात डॉ कलाम यांनी संत आणि अध्यात्मिक क्षेत्रातील दृष्ट्या लोकांसोबत  झालेल्या त्यांच्या भेटींचा उल्लेख केला आहे आणि त्यांचे विचार आदरपूर्वक मांडले आहेत. डॉ.  कलाम यांनी विज्ञान आणि तत्त्वज्ञान तसेच  विकास आणि नैतिकता यांना समान महत्त्व दिले,असे राष्ट्रपती म्हणाले.

प्रत्येक भारतीयाने, विशेषतः तरुणांनी डॉ. कलाम यांचे 'विंग्स ऑफ फायर' हे आत्मचरित्र वाचावे.  आपल्या तरुणांनी डॉ कलाम यांच्या अमूल्य शिकवणीचा आपल्या जीवनात अंगीकार करावा असे राष्ट्रपतींनी सांगितले. आपल्या शिक्षकांचा आदर करणे आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकी राखणे हे डॉ कलाम यांच्या कथेतून वारंवार दिसून येते.त्यांच्यासोबत  काम करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटली. जीवनातील साधेपणा आणि विचारांची उंची ही डॉ. कलाम यांची वैशिष्ट्ये आहेत, असे राष्ट्रपती म्हणाले.

स्मृती व्याख्यानांच्या माध्यमातून डॉ कलाम यांचे आदर्श लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल राष्ट्रपतींनी इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरची (आयआयसी) प्रशंसा केली. आयआयसी आपल्या  उद्दिष्टानुसार, राष्ट्रीय एकात्मतेसाठी सतत कार्यरत आहे हे जाणून त्यांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करूनआयआयसी  डॉ कलाम यांच्यासारख्या राष्ट्रनिर्मात्याचा वारसा बळकट  करत आहे, असे ते म्हणाले. डॉ कलाम यांनी नव्या  पिढीमध्ये ज्यांना 'पाच सामर्थ्यशाली माणसे ' म्हटले आहेत्या वैज्ञानिकांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी आयआयसीला केले.

 S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 


(Release ID: 1842882) Visitor Counter : 169


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil