ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कांदा-टोमॅटोच्या किमती कमी होण्यास मदत


गेल्या महिन्यात टोमॅटोच्या देशभरातील किरकोळ दरात 29 टक्क्यांची घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या किरकोळ दरात 9 टक्क्यांची घट

कांद्याची आवक कमी असतानाच्या काळात दर नियंत्रणात ठेवण्यासाठी 2.5 लाख टन इतका कांद्याचा राखीव साठ्याची तरतूद

Posted On: 19 JUL 2022 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2022

 

मोसमी पावसाला सुरुवात झाल्यानंतर बाजारात टॉमटोची आवक वाढल्याने देशभरात टोमॅटोच्या किरकोळ दरात 29 टक्क्यांची घट झाली आहे. तसेच, कांद्याच्या किमतीही आता बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत, कांद्याच्या दरात 9 टक्क्यांची घट झाली आहे.

चालू वर्षांत, कांद्याची आवक कमी झाल्यानंतरही किमती नियंत्रणात राहाव्यात या हेतूने, केंद्र सरकारने 2.50 लाख टन कांद्याचा राखीव साठा तयार केला आहे.सरकारने केलेली कांद्याची ही आजवरची सर्वाधिक खरेदी आहे. या वर्षी कांद्याचे विक्रमी म्हणजे 317.03 लाख टन एवढे उत्पादन झाल्याचा अहवाल कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने दिला आहे. एवढे विक्रमी उत्पादन होऊनही, सरकारने राखीव साठयासाठी कांदा खरेदी केल्याने, बाजारात मागणी पुरवण्याचा समतोल कायम राहिला, पर्यायाने कांद्याचे भाव गडगडले नाहीत.

राखीव साठयामधला कांदा, मंदीच्या काळात बाजारात टप्प्याटप्याने आणि आवश्यक तेवढाच आणला गेला. त्यामुळे कांद्याची मंदी असतांनाही म्हणजे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात किमती नियंत्रणात राहिल्या.आता पुढेही गरजेनुसार, खुल्या बाजारात कांद्याची आवक केली जाईल. तसेच, राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि सरकारी संस्थांना किरकोळ बाजारात कांद्याची आवक वाढवण्यासाठीह्या राखीव साठयामधील कांदा दिला जाईल. ज्या राज्यात/शहरात कांद्याच्या किमती वाढताहेत, अशा ठिकाणी कांद्याची उपलब्धता मागणीनुसार वाढवण्यासाठी, ह्या साठयामधील कांदा खुल्या बाजारात आणला जाईल.

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1842876) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi , Odia