आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 200 कोटी पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील 3 कोटी 79 लाखांहून अधिक किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 1,44,264

गेल्या 24 तासात देशात 16,935 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.47%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.58% आहे

Posted On: 18 JUL 2022 1:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 जुलै 2022 

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 200 कोटींचा (2,00,04,61,095) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,63,34,227 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 79 लाखांहून अधिक (3,79,98722) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,10,336

2nd Dose

1,00,79,797

Precaution Dose

60,24,487

FLWs

1st Dose

1,84,27,577

2nd Dose

1,76,52,344

Precaution Dose

1,14,69,971

Age Group 12-14 years

1st Dose

3,79,98,722

2nd Dose

2,62,25,897

Age Group 15-18 years

1st Dose

6,08,48,302

2nd Dose

5,01,31,500

Age Group 18-44 years

1st Dose

55,88,99,360

2nd Dose

50,59,28,479

Precaution Dose

64,24,565

Age Group 45-59 years

1st Dose

20,35,69,720

2nd Dose

19,45,74,456

Precaution Dose

46,43,182

Over 60 years

1st Dose

12,73,61,591

2nd Dose

12,15,80,188

Precaution Dose

2,82,10,621

Precaution Dose

5,67,72,826

Total

2,00,04,61,095

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,44,264 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या 0.33% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.47% झाला आहे. गेल्या 24 तासात 16,069 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,30,97,510 झाली आहे.

गेल्या 24 तासात, देशात नव्या 16,935 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात देशात एकूण 2,61,470 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 86 कोटी 96  लाखांहून अधिक (86,96,87,102) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 6.48% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 4.58% इतका नोंदला गेला आहे.

* * *

S.Tupe/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1842314) Visitor Counter : 163